कोल्हापूर: नदीने सांयकाळी धोका पातळी ओलांडल्याने आणि धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफची आणखी दोन पथके दाखल झाली आहेत. सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून १०२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ३७ मार्ग बंद झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आंबेवाडी, चिखली यासह जिल्ह्यातील २३ गावांतील चार हजारांवर लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. ( water level crosses danger mark )

वाचा:

कोल्हापूर शहरात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. पण धरण क्षेत्रात मात्र अजूनही त्याचा जोर कायम आहे, यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगा नदीने सायंकाळी धोका पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील लोकांचे स्थलांतर सुरू आहे. शहरातील सुतार मळा येथील वीस कुटुंबाचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात अनेक भागात पाणी घुसले आहे. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सक्रिय झाले आहे.

वाचा:

३७ मार्ग वाहतुकीसाठी बंद

जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाणी आल्यामुळे ३७ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोल्हापूर ते रत्नागिरी, आजरा ते आंबोली, कोल्हापूर ते , कोल्हापूर ते राधानगरी या प्रमुख मार्गांचा समावेश आहे. यामुळे गोवा व कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. रेडेडोह फुटल्याने रत्नगिरी, पन्हाळा व जोतिबा डोंगराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. काही गावात पुराचे पाणी घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन ची आणखी दोन पथके कोल्हापुरात दाखल झाली आहेत. दरम्यान, गेल्या महिन्यातच दोन पथके कोल्हापुरात दाखल झाली होती. आता चार पथकांच्या वतीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक पथकात २२ जवानांचा समावेश असून ५५ बोटी कार्यान्वित केल्या आहेत. नद्यांना वाढलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील १०२ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यातील सर्व धरणे फुल्ल भरली आहेत. राधानगरी धरणही शंभर टक्के भरले आहे. सायंकाळी सात वाजता राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले.
हे दरवाजे उघडल्याने भोगावती नदी पात्रात मोठा विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे ३ आणि ६ क्रमांकाचे दरवाजे उघडले आहेत.

दरम्यान, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पाणी पोहोचल्याने पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here