Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीननगर (Chhatrapati Sambhaji Nagar ) शहर पोलिसांकडून अवैध धंदे चालू देण्यासाठी हप्ते वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दोन दिवसांपूर्वी ‘एबीपी माझा’वर बोलताना केला होता. दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन दानवे यांनी संपूर्ण हप्ते वसुलीची यादीच माध्यमांसमोर जाहीर केली आहे. कोणत्या गोष्टीसाठी कोण किती रुपयांची हप्ते वसुली करतो अशा एजंटच्या नावासहित यादी दानवे यांनी जाहीर केली आहे.  त्यांच्या या आरोपाने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तर महिन्याला 60 लाख ते 80 लाख रुपये संभाजीनगर शहर पोलीस जमा करत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. त्यामुळे यावर पोलिसांची आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

कोणाला कोठून किती हप्ता…

गुटखा वसुली यादी 

गावठी दारू वसुली यादी


मटका वसुली यादी 


लॉटरी वसुली यादी


लॉजिंग, वाईन शॉप, जुगार वसुली यादी…


वाळू, गॅस रिफिलिंग वसुली यादी 


मुरूम तस्करी वसुली यादी 


खाजगी वसुली…


हिंसाचारामागे पोलीस आयुक्त तर नाही ना?

दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील वादावरून देखील दानवे यांनी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्यावर टीका केली आहे. वाद होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच मी मुख्यमंत्र्यांना पोलिसांबाबत पत्र लिहलं होतं. तर शहरात हिंसाचाराची घटना व्हावी असे पोलीस आयुक्तांना वाटत होते. सत्ताधारी पक्षाच्या नादी लागून अशी त्यांची भूमिका असावी अशी आम्हाला शंका आहे. आमची सभा रद्द करावी यासाठी हे सगळं होत का असाही प्रश्न पडतोय?, जेव्हा वादाची घटना घडली तेव्हा पोलीस आयुक्त तब्बल दोन तास उशिरा आले. त्यामुळे हे शहर त्यांना जळून द्यायचे होते का? अशी शंका आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाचो चौकशी व्हावी, असे दानवे म्हणाले.  

रामनवमीच्या एक दिवस आधीच शहरात हिंसाचार होण्याची भीती आहे असे मी पोलीस आयुक्तांना सांगितले होते. त्यादिवशी 7 वाजता घडलेली घटना दुर्लक्षित केली, त्यामुळे रात्री 1 वाजता हिंसाचार झाला. पोलीस आयुक्तांना हिंसाचार सुरु असताना कुणाकुणाचे फोन आले हे त्यांनी सांगावे. आमच्या सारखांच्या अनेकांचे फोन तर त्यांनी घेतलेच नव्हते. या शहरात अवैध धंदे सुरु असून, त्यांनी सज्जन असण्याचा बुरखा घालताय. सर्व अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीस हप्ते घेत असल्याचे देखील दानवे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

छ. संभाजीनगर पोलीस आयुक्तांच्या आशीर्वादाने हप्ते वसुली, विमानाने पोहचतात पैसे; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here