अहमदनगर :थेट पक्षीय संबंध नसला तरी सध्या सुरू असलेल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. वरिष्ठ पातळीवर राजकीय अस्थिरता आणि अनिश्चितता असताना स्थानिक पातळीवरही पदाधिकारी, कार्यकर्ते स्वत:चे वेगळे निर्णय घेत आहेत. कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर तसेच शिवसेना ठाकरे गटाचे बळीराम यादव यांना भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये प्रवेश केला आहे. तालुकाध्यक्षच भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तापकीर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

कर्जत तालुक्यात आमदार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात सर्वच आघाड्यांवर चुरशीचे राजकारण सुरू आहे. त्यातच शिंदे यांनी आपण आगामी विधानसभा आणि संधी मिळाली तर लोकसभा निवडणूकही लढविणार असल्याची घोषणा केली आहे. याच दरम्यान सध्या बाजार समितीची निवडणूक होत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व जामखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजप प्रणित स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलची घोषणा करण्यात आली.

लेक विहिरीत पडला, वाचवण्यासाठी झेपावलेली आई बुडू लागली अन् आणखी दोन लेकरांचा जीव गेला

मंगेश जगताप, अभय पाटील, काकासाहेब तापकीर, प्रकाश शिंदे, रामदास मांडगे, भरत पावणे, नंदकुमार नवले, महिला राखीव – विजया गांगर्डे, लिलावती जामदार, ग्रामपंचायत मतदार संघ – सुरेश मोढळे, बळीराम यादव, अनुसूचित जाती/जमाती – बाळासाहेब लोंढे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – सभाजी बोरुडे, इतर मागासवर्गीय – नितीन पाटील, व्यापारी/आडते मतदार संघ – अनिल भंडारी, कल्याण काळे, विमुक्त जाती/भटक्या जमाती- लहू वतारे, हमाल/मापाडी मतदार संघ – बापूसाहेब नेटके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यामध्ये तापकीर आणि यादव यांच्या नावामुळे चर्चा सुरू झाली.

अतिक अहमद हत्या प्रकरणी नवी अपडेट,आरोपींना पत्रकारांसारखं काम करायचं ट्रेनिंग दिलं,आता पोलिसांनी तिघांना उचललं

बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षचिन्ह नसते. असे असले तरी राजकीय दृष्ट्या नेता ज्या पक्षाचा आहे, त्याच पक्षाचं म्हणून हे पॅनल ओळखलं जातं. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाचा आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश झाल्याने शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिल्याचे मानले जाते.

रोहितच्या मनात चाललंय तरी काय? ३५ चेंडूत शतक तर ६५ मध्ये १६२ धावा ठोकणाऱ्याला संघाबाहेर ठेवलंय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here