ITC शेअरचा विक्रमी उच्चांक
आयटीसीच्या शेअर्सनी आजच्या देशांतर्गत मार्केट सत्रात एनएसईवर ४०२.६५ रुपये आणि बीएसईवर ४०२.६० रुपयांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. देशांतर्गत आणि जागतिक बाजारात अस्थिर मूड असतानाही सिगारेट ते हॉटेल्सच्या व्यवसायात कार्यरत असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये यंदा वाढ होत आहे. आज गुरुवारी ITC शेअर्सनी इंट्राडे ट्रेडमध्ये १% हून अधिक वाढीसह ४०२.६० रुपये अशा विक्रमी पातळीवर झेप घेतली.
पैसा गुंतवण्यासाटी सुरक्षित असा मानल्या जाणाऱ्या ITCने पेपर, FMCG आणि हॉटेल्ससह सर्व व्यवसाय विभागांमध्ये चांगली कामगिरी करत बर्याच गुंतवणूकदारांना आकर्षित केले.
ITC शेअरची वाटचाल
गुंतवणूकदारांचा आवडता स्टॉक असलेल्या आयटीसीने गेल्या एका महिन्यात जवळपास ६ टक्के आणि वर्षभरात ५० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली असून त्याचे लाभांश उत्पन्न ३.०७ टक्के आहे.
ITC शेअर्सवर एक्स्पर्टसचा सल्ला काय?
दरम्यान, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म शेअरखानने काउंटरवर ‘बाय’ (खरेदी) रेटिंग दिले आहे. कंपनीच्या वाढीची शक्यता अबाधित आणि तिचे आकर्षक मूल्यांकन आहे, असे त्यात म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे देशांतर्गत ब्रोकरेज प्रभुदास लिल्लाधर यांनी स्टॉकवर ‘अॅक्युम्युलेट’ रेटिंग दिले, आणि लक्ष्य किंमत (टार्गेट प्राईस) ४४४ रुपये निश्चित केली. तसेच ब्रोकरेजने मार्च २०२३ च्या तिमाहीत FMCG क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांपैकी ITC असेल, असा अंदाज बांधला आहे.
२०२३ मध्ये जोरदार कमाई
भारतीय बाजारात मागील एक वर्ष ITC शेअर्ससाठी चांगले ठरले आहे. या कालावधीत कंपनीने आपल्या स्थितीतील गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक परतावा दिला. तर सध्या, ITC समभागांनी निफ्टी५- मध्ये सर्वोत्तम परतावा दिला आहे. तसेच गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे कंपनी २०२३ मध्ये २०% हून अधिक परतावा देण्यात यशस्वी ठरली आहे.