७४ वर्षांच्या वृद्धाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. दवे आजोबा जागीच्या जागी कोसळले. त्यावेळी शेजारची महिला त्यांच्यासाठी धावून आली. तिनं आजोबांना सीपीआर दिला.

 

mumbai news
मुंबई: गेल्या काही महिन्यांत हृदयविकाराच्या धक्क्यांनी मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा परिस्थितीत वेळीच उपचार मिळाल्यास जीव वाचू शकतो. मुंबईच्या चिराबाझारात राहणाऱ्या ७४ वर्षीय शशिकांत दवे यांना १४ एप्रिलला हृदयविकाराचा झटका आला. शेजारी राहणाऱ्या हर्षा भगत यांनी दवे यांना ४० मिनिटं कृत्रिम श्वासोच्छवास दिला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.माजी परिचारिका असलेल्या हर्षा ३ दशकांपूर्वी सीपीआरची पद्धत शिकल्या. याच सीपीआरनं दवे यांना नवं आयुष्य मिळालं. त्यामुळे दवे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘तिनं माझं आयुष्य वाचवलं. ती माझी दुसरी आईच आहे. तिचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही,’ अशा शब्दांत दवे यांनी हर्षा यांचे आभार मानले. १४ एप्रिलला दवे यांना हृदयविकाराचा झटका आला. हर्षा यांनी समयसूचकता दाखवत ४० मिनिटं दवे यांना सीपीआर दिला. दवे यांना १८ एप्रिलला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
पँट्री मॅनेजर साखळी खेचायचा, ट्रेन लेट; पवारांनी फिल्डिंग लावून पकडले, कारण ऐकून चक्रावले
सैफी रुग्णालयात दवेंवर उपचार झाले. डॉ. कौशल छत्रपतींनी त्यांच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंट्स बसवले. हर्षा भगत यांनी प्रसंगावधान राखत सीपीआर दिल्यानं मोठा फरक पडल्याचं डॉ. कौशल म्हणाले. ‘त्यांनी दवेंच्या छातीवर दाब देत हृदयाला होत असलेला रक्तपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेतली. दवेंच्या एका धमनीतून होणारा रक्तप्रवाह पूर्णपणे थांबला होता. मात्र भगत यांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे मोठा फरक पडला,’ असं कौशल यांनी सांगितलं.
मुलांना मामाकडे पाठवलं, होम पेटवला; जोडप्यानं दिली प्राणांची आहुती; भिंतीवर सापडली चिठ्ठी
हृदय विकाराचा तीव्र झटका आल्यावर अनेकदा हृदयाचे ठोके बंद पडतात. मेंदूची क्रिया सतत सुरू ठेवण्यासाठी हृदय रिस्टार्ट करण्याची गरज असते. अशा परिस्थितीत सीपीआर मोलाची कामगिरी बजावतो. दवेंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके शून्यावर आले होते. सैफी रुग्णालयात त्यांना दोनवेळा शॉक देण्यात आला. यानंतर पुढच्या काही मिनिटांत त्यांची हृदयक्रिया पूर्ववत झाली. पुढे त्यांच्यावर अँजियोप्लास्टी करण्यात आली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here