याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून चार आरोपींविरोधात पाथरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख अरबाज, शेख शकिल, शेख आय्युब, शेख अतिक अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास पाथरी पोलीस करत आहेत.
रामनवमीला डीजे लावण्यास पोलिसांनी रोखलं; दोन युवक थेट विषारी औषध प्यायले
परभणीच्या पाथरी शहरात राहणारी १९ वर्षीय तरुणी आपल्या तेरा वर्षाच्या बहिणीसोबत शेतामध्ये शौचालयास गेली होती. यावेळी शेख अरबाज, शेख शकिल, शेख आय्युब, शेख अतिक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दोन्ही मुलींची अगोदर छेड काढली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी दोन्ही मुलींना बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने १९ वर्षीय मुलीवर अत्याचार केला.
अत्याचार होत असल्याने मुलीने आरडाओरड केली. त्यानंतर मुलीचे पालक घटनास्थळाकडे येत असल्याचं पाहून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. इथून जाताना आरोपींनी मुलीला आणि त्यांच्या पालकांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पाथरी पोलीस ठाण्यामध्ये शेख अरबाज, शेख शकिल, शेख आय्युब, शेख अतिक या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिकाने करत आहेत. दरम्यान बहिणीसोबत शेतामध्ये शौचालयास गेलेल्या १९ वर्षीय मुलीवर मारहाण करून अत्याचार करण्यात आलेल्या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून परभणीमध्ये अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना करण्याचं बोललं जात आहे.