पुणे :पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर आता पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसह सर्वच प्रमुख पक्षातील नेत्यांनी लॉबिंगला सुरुवात केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे तर बापटांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशीच भावी खासदार म्हणून बॅनर लागले होते. त्यानंतर याच लोकसभा जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये देखील जोरदार जुंपली आहे. पुणे लोकसभेची जागा ही आघाडी असताना काँग्रेस लढवत आली आहे. मात्र आता या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपण स्वतः ही पोटनिवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं याआधीच स्पष्ट केलं आहे. जगतापांच्या या दाव्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील हिरवा कंदील दाखवल्याची चर्चा आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या या भूमिकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार विरोध केला होता. मात्र, त्यानंतर देखील राष्ट्रवादी आपली भूमिका बदलताना दिसत नसल्याने पुण्यातील या येऊ घातलेल्या पोटनिवडणूकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाबाहेर भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जर लागली तर आपण जिंकू, असा विश्वास अनेकांना वाटत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून देखील ही जागा आपण लढवावी अशी इच्छा खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली असल्याचं कळतंय. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासाठी तशी मागणी करणार असल्याचं उघडं मत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

बाजारपेठेत भाव नाही, पांढरं सोनं घरातचं पडून; कापसामध्ये पिसवांची पैदास, शेतकऱ्यांनी घेतला कटू निर्णय

पुणे लोकसभेची काँग्रेसची पारंपारिक जागा आहे. मात्र, राष्ट्रवादीकडूनच निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. यावर काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून ही आमचीच जागा असल्याने आम्ही या जागेवर दावा का करावा असं मत काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीकडून पुणे लोकसभेवरील दावा सांगितला जात असून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार म्हणून त्यांच्या नावाची मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुण्यात लोकसभेच्या जागेवरून काही चर्चा तर झाली नाही ना? असाही प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. निमित्त वाढदिवसाचे लॉबिंग मात्र खासदारकीची सुरु असल्याचं चित्र आहे.
सोशल मीडियावर या भारतीय खेळाडूवर निघाली भडास, हा संघाला एकदा तरी…

दरम्यान, पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता जास्त असून भाजपकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यामध्ये गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार मेधा कुलकर्णी, खासदार संजय काकडे ही नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडून मोहन जोशी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि नुकतेच आमदार झालेले रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर आता या स्पर्धेमध्ये राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचे नाव पुढे आलं आहे.

राम शिंदेंनी मोठा डाव टाकला,बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाला उमेदवारी, कर्जतमध्ये खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here