मयत अनिल चव्हाण हे हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदमध्ये शिक्षक पदी कार्यरत होते. २०१४ साली त्यांची शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त झाली होती. सेवेदरम्यान त्या शिक्षकाचे शाळेतील एका महिला शिक्षिकेशी सूत जुळले. मात्र, काही वर्षानंतर त्यांच्यात कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद होत होता. यादरम्यान त्या सहशिक्षिकेने पैशांची मागणी करत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. दूसरीकडे पतीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण शिक्षकाच्या पत्नीला देखील लागली होती.
पिकाचे पैसे आले की मुलीच लग्न करु अशी त्या बापाची इच्छा; पण उद्धवस्त झालेलं सोयाबीन पाहून शेतकऱ्याची आत्महत्या
एकीकडे ब्लॅकमेल सुरु होतं आणि दूसरीकडे या प्रकरणाची घरी माहिती लागल्याने तो शिक्षक मानसिक तणावात होता. प्रकरण कसं मिटवावं? हे त्या शिक्षकाला समजत नव्हतं. अखेर परीक्षेचे पेपर तपासायचं आहे असं खोटं सांगून तो शिक्षक बुधवारी रात्री घरातून निघाला. शाळेत पोहोचल्यानंतर शाळेतील खोलीत गळफास घेऊन शिक्षकाने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शाळेत आलेल्या सेवकाला अनिल चव्हाण यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मनाठा पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी सुसाईड नोट देखील आढळून आली.
“सहशिक्षिका वारंवार पैशाची मागणी करत मला ब्लॅकमेल करत आहे. या ब्लॅकमेलला मी थकून गेलोय”. त्यामुळे आत्महत्या करत असल्याचे चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करुण शवविच्छेदनासाठी मृतदेह हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनं एकच खळबल उडाली आहे. मयत अनिल चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. दरम्यान, चिठ्ठीत ज्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.