कोल्हापूर: कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयाच्या शवविच्छेदनाच्या खोलीशेजारी असलेल्या एका शेडमध्ये भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडल्याचे समोर आलं आहे. यामुळे सीपीआर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता हे मृत अर्भक कुठून आणले? की कोणी टाकले का कुत्र्यांनी वैद्यकीय कचऱ्यातून ओढून आणले? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, आणि बेळगावसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील अनेक लोकं कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. विशेषतः सीपीआर रुग्णालयात प्रसुती मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे हा विभाग मोठा असल्याने नागरिकांची नेहमीच गर्दी असते. दरम्यान, आज सकाळी दहाच्या सुमारास सीपीआर रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या खोलीशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये भटक्या कुत्र्यांकडून एका मृत अर्भकाचे लचके तोडले जात असल्याचे निदर्शनास आले.

महाराष्ट्राचा अथर्व तायडे पहिल्या चेंडूवर चौकार मारूनही दुर्देवी ठरला, पंचांनी नाबाद दिले अन्…
जेव्हा हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आला त्यानंतर याची माहिती नागरिकांनी सीपीआरमधील कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपूरी पोलीस हे सीपीआर रुग्णालयात पोहोचले आणि मृत अर्भकाचे अवशेष ताब्यात घेतले. मात्र, अर्भक सीपीआरच्या आवारात कोणी टाकले हे माहिती नसल्याने आता पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय कचऱ्यातून कुत्र्यांनी मृत अर्भक ओढून आणले असावे अशीही शक्यता येथील अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. मात्र, हा मृत अर्भक कचऱ्यात कोणी टाकले याची चौकशी सीपीआरमधील अधिकाऱ्यांनी सुरू केली असून या घटनेनं सीपीआर मधील सुरू असलेला कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

दादा, आम्ही सदैव तुमच्यासोबत! पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाने भरचौकात फ्लेक्स लावला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here