कोल्हापूरः अध्यात्मिक क्षेत्रातील जाणते व्यक्तिमत्त्व, संत वाड:मय व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक सदगुरू डॉ. गुरुनाथ यांचे गुरुवारी दुपारी वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुपारी त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मुंगळे यांना मानणारा शिष्यवर्ग राज्यभर असून त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. मुंगळे हे शिवाजी पेठ येथील त्यांच्या पत्नीसमवेत राहत होते. काल दुपारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या शिष्यांनी त्यांना तातडीने नागाळा पार्क येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. आज दुपारी त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यातच अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. यामध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई येथे जन्मलेल्या डॉ. गुरुनाथ मुंगळे यांनी इंग्रजी व संस्कृत विषयात एम.ए. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन पुणे व येथे इंग्रजीच्या अध्यापनाचे कार्य केले. १९५७ पासून त्यांनी श्री दत्त भक्तीस सुरुवात केली होती. त्यांनी संत वाड:मय व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. संतचरित्रे व तत्त्वज्ञान या विषयावर त्यांनी विविध ठिकाणी व्याख्याने व प्रवचन देण्यास सुरुवात केली. संत साहित्यावर विपुल लेखन केले. त्यांना दिल्ली येथील जागतिक शांतता परिषदेला आमंत्रित करण्यात आले होते. डॉ. मुंगळे हे कोल्हापूर येथे भरलेल्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

वाचा:

२००१ मध्ये पुणे महापालिकेने त्यांचा मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला होता. त्यांच्या संत साहित्यातील कामगिरीबद्दल त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. आळंदी नगरपालिका, हुपरी येथील एल.वाय. पाटील ट्रस्ट, श्री वटवृक्ष स्वामी महाराज ट्रस्ट अक्कलकोट यांचा त्यामध्ये समावेश होता. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने त्यांना डि.लीट ही पदवी देऊन सन्मानित केले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने त्यांचा करवीरभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. पुण्यातील पाषाण येथे त्यांच्या नावाने ध्यानगृह सुरू करण्यात आला. दत्त संप्रदायाच्या प्रसारासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. यातूनच राज्यभर त्यांचा शिष्यवर्ग तयार झाला. समाजातील अनेक वरिष्ठ व्यक्तीशी त्यांचा निकटचा संबंध होता.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here