वाचा:
मध्ये आज ९८८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने करोनावर मात करणाऱ्या एकूण कोविड योद्ध्यांची संख्या ९२ हजार ६६१ इतकी झाली आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासांत ९१० नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या १ लाख २० हजार १६५ इतकी झाली आहे. त्यापैकी २० हजार ५६२ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. मुंबईतील करोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के इतके असून ३० जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीतील रुग्णवाढीचा वेग ०.८७ टक्के इतका आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता ८० दिवसांवर पोहचला आहे.
दरम्यान, मुंबईत आतापर्यंत ५ लाख ७४ हजार ९१९ इतक्या करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सध्या शहर व उपनगरातील चाळी व झोपडपट्ट्यांमध्ये ६२१ कंटेन्मेंट झोन असून ५ हजार ६०९ इमारती सील करण्यात आल्या आहेत.
वाचा:
२४ तासांत ५७ रुग्ण दगावले
मुंबईतील करोना बाधित रुग्ण दगावण्याचे प्रमाण अजूनही मोठे आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ५७ रुग्ण दगावले असून एकूण मृत्यूंची संख्या ६६४५ इतकी झाली आहे. ५७ मृतांपैकी ४१ रुग्ण अन्य व्याधींनी ग्रस्त होते. ३५ पुरुष आणि २० महिला रुग्णांचा मृत्यू झाला. २ मृत रुग्ण ४० वर्षांखालील, ३० जण ६० वर्षांवरील तर २५ जण ४० ते ६० वर्षे वयोगटातील होते, अशी माहिती पालिकेने दिली.
वाचा:
राज्यात ३१६ करोना बाधितांचा मृत्यू
राज्यात आज १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या एकूण २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने (१९.२८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत ३१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.