नवी : दिल्लीतील पश्चिम विहार वेस्टच्या पीरागढी परिसरातील १३ वर्षीय करणाऱ्या क्रूरकर्म्याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आलंय. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या हत्येचा क्रूर प्रयत्न करण्यात आला होता. बलात्काराला विरोध करणाऱ्या या अल्पवयीन मुलीच्या डोक्यावर आणि शरीरावर कैचीनं वार करण्यात आले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला मृत समजून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. संबंधित अल्पवयीन मुलगी रुग्णालयात दाखल असून तिच्यावर उपचार सुरू आहे.

दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एम्स रुग्णालयात स्वत: पीडित मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसंच डॉक्टरांकडून मुलीच्या तब्येतीविषयी माहिती घेतली. सोबतच कुटुंबाला शक्य ती मदत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं. तत्काळ मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत दिलीय. आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी दिल्ली सरकारकडून वकील दिला जाईल, असंही केजरीवाल यांनी यावेळी म्हटलं.

वाचा :

वाचा :

मुळचं बिहारचं असलेलं संबंधित पीडित कुटुंब आपल्या १३ वर्षीय मुलीसह पीरागढी इथं भाड्यानं राहतं. ते ज्या फ्लॅटमध्ये राहतात ती इमारत तीन मजल्यांची असून, त्यात २५ फ्लॅट आहेत. परिसरातील कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार त्या ठिकाणी राहतात. पीडित मुलीची मोठी बहीण नोकरी करते. त्यामुळे पीडित मुलगी ही घरात एकटीच असते. हीच वेळ साधून मंगळवारी सायंकाळी या मुलीवर बलात्कार करण्यात आला. तिला कैचीनं भोसकल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत मुलगी सरकत शेजारील फ्लॅटपर्यंत पोहोचली. दरवाजा ठोठावून तिनं शेजाऱ्यांना बोलावून घेतलं. त्यांना सर्व हकिकत सांगत असतानाच ती बेशुद्ध पडली. शेजारच्यांनी तिच्या आईवडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीला उपाचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पुढचे २४ ते ४८ तास मुलीच्या जीवासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणखी एका ”ची कहाणी समोर आल्यानंतर देशभरातून पुन्हा एकदा संताप आणि आक्रोश व्यक्त करण्यात येतोय.

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

4 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here