म. टा. प्रतिनिधी, हडपसर :चौदा वर्षाच्या मुलाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना गुरुवारी घडली. वेदांत (साई) विनोद धामणगावकर (वय १४, रा. विकासनगर, वानवडी) असं या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. शाळेला सुट्टी लागल्यामुळे तो मित्रांसोबत गुरुवारी सकाळी क्रिकेट खेळायला गेला होता. खेळत असताना वेदांतने वडिलांना फोन करून छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याला तत्काळ जवळच्या दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मोठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे सांगितले. त्यामुळे वेदांतला फातिमानगर येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कुठे उष्णतेची लाट, तर कुठे अवकाळी पाऊस! आता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली मोठी चिंता

वेदांतचा हृदयविकाराने नैसर्गिक मृत्यू झाल्याचे कारण डॉक्टरांनी दिल्याने वानवडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अवघ्या १४ वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने वानवडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बोरघाटातील अपघातातून बचावलेल्या मुलाला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here