मुंबई: मुख्यमंत्री यांचा फोटो एडिट करून त्यांचा मौलवीच्या वेशातील फोटो ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या नावाच्या महिलेविरुद्ध मुंबईतील सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला या महिलेला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. सदर महिलेला जामीन मिळावा म्हणून दिल्ली भाजपचे प्रवक्ते ताजिंदर पाल बग्गा यांच्या सांगण्यावरून भाजप युवा मोर्चाचे यांनी मदत केल्याचेही समोर आले आहे. ( Offensive post against CM )

सुनयना होले नावाच्या महिलेने आपल्या ट्विटर हँडलवरून २५ जुलै रोजी आक्षेपार्ह फोटो व मजकूर पोस्ट केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे व पर्यावरण मंत्री यांचा फोटो एडिट करून पोस्ट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना मौलवीच्या वेशात दाखवण्यात आले आहे तर आदित्य यांच्या फोटो साप दूध पितानाचा फोटो इन्सर्ट करण्यात आला आहे. त्यानंतर २८ जुलै रोजी आणखी एक ट्विट करण्यात आले असून त्यात अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करण्यात आला आहे. ट्विटमध्ये #SushantSinghRajput #CBICantBeDeniedForSSR हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. या दोन्ही ट्विटवर तीव्र आक्षेप घेत अॅड. धर्मेंद्र मिश्रा यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून समाज माध्यमाचा गैरवापर करून ज्याप्रकारे बदनामीकारक फोटो व मजकूर पोस्ट करण्यात आला आहे तो एकप्रकारे महाराष्ट्राचाच अपमान आहे. या पोस्टमुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याचीही भीती आहे. त्यामुळेच या प्रकरणी गंभीर दखल घेण्यात यावी व सुनयना होले नाव धारण करून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सदर व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती मिश्रा यांनी आपल्या तक्रारीत करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत भा. दं. वी. कलम १५३ (अ), ५०५ (२), ५००, ५०१, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला व संबंधित महिलेला अटक केली. अटकेनंतर सदर महिलेला जामीनही मिळाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण बरंच तापलं आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस तपास करत असून त्यावर विरोधी पक्षाकडून शंका उपस्थित करण्यात आल्या. त्यात आदित्य ठाकरे यांचेही नाव ओढण्यात आले. याप्रकरणी आदित्य यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी विरोधकांच्या आरोपांची मालिका सुरूच आहे. बिहार सरकारच्या शिफारशीवरून आता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. आजच सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून सीबीआयचा तपास सुरू झाला आहे. दुसरीकडे ईडीकडूनही याप्रकरणी तपास सुरू आहे. त्यामुळे लगेचच हे प्रकरण निवळण्याची शक्यता नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here