नवी दिल्लीः१० वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याचा पोलिसांना फोन आला. तातडीने पावलं उचलत त्यांनी अॅक्शन घेतली. मात्र, काहीवेळाने मुलगी स्वतःहूनच घरी आली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकून पोलिसांनीही डोक्यावर हात मारला. दिल्लीत ही घटना घडली आहे.१८ एप्रिल रोजी संध्याकाळी पोलिसांना एक फोन आला होता. त्यात त्यांची १० वर्षांची मुलीला १७ एप्रिलरोजी अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले. मात्र, एका महिलेच्या मदतीने तीची सुटका झाली व ती सात वाजता घरी परतली, असं महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं. या फोननंतर पोलिसांनी मुलीच्या आईला व तिच्या आईला पोलिस ठाण्यात बोलावलं. त्याचबरोबर डीसीडब्लूच्या हेल्पलाइनवर कॉल करुन एनजीओच्या काउन्सलरलादेखील बोलवण्यात आलं. जेणेकरुन मुलीचं काउन्सलिंग केले जाऊ शकेल.

पुण्यात ओला, उबरची रिक्षा, सेवा बंद होणार?; आरटीओने परवाना नाकारला, कारण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ एप्रिल रोजी दुपारी साधारण ३ वाजता गाजीपूरमधील मेन रोडवर बँक पासबुक अपडेट करण्यासाठी मुलगी गेली होती. त्याचवेळी सफेद रंगाच्या कारमधून आलेल्या दोन तरुणांनी तिचं अपहरण केलं आणि एका अज्ञात स्थळी तिला सोडण्यात आलं, असं मुलीने सांगितलं.

कुठे उष्णतेची लाट, तर कुठे अवकाळी पाऊस! आता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली मोठी चिंता
अल्पवयीन मुलगी सातत्याने तिचा जबाब बदलत होती. त्यामुळं पोलिसांना थोडा वेगळाच संशय आला. त्यांनी अधिक खोलात जाऊन चौकशी केल्यानंतर तरुणीने घडलेला सगळा प्रकार सांगितला. ते ऐकूनच पोलिसच चक्रावले. १० वर्षांच्या मुलीवर तिची आजी रागावली तसंच, तिच्या पाठीत धपाटा घातला म्हणून ती रागावली आणि रागात तिने घर सोडले. तिचे कोणीही अपहरण केलं नाही, असं तिने सांगितलं.

साहेबच बनले ड्रायव्हर; सेवानिवृत्त पोलिसाला भावनिक निरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here