दौंड, पुणे:तुला सारख्या मुली होतात, तुला मुलगा होत नाही असे म्हणून त्रास देत असत. तसेच सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील एका विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.अश्विनी योगेश चौधरी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून याबाबत संदेश जयसिंग काळकुटे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सासु मंदा ज्ञानदेव चौधरी, पती योगेश ज्ञानदेव चौधरी, सासरे ज्ञानदेव सोनबा चौधरी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुरुवार दि.२० एप्रिल रोजी ही घटना घडली आहे.

याबाबत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यांची बहीण अश्वीनी योगेश चौधरी हिचे लग्न काही वर्षापूर्वी योगेश चौधरी याच्याशी झाले होते. लग्नानंतर अश्वीनीला तीन मुली झाल्या. लग्नानंतर अश्विनी हिला दोन वर्ष चांगले नांदवले. त्यानंतर तिला किरोकोळ कारणावरुन सासू, सासरे, नवरा हे मारहाण करत. तुला सारख्या मुलीचं होतात. असे टोमणे मारत असत. याबाबत बहिणीने मला अनेकदा फोनवर याबाबत माहिती दिली होती आणि अनेकदा समजूत काढून आम्ही अश्विनीला नंदायाला पाठवले.

१० वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याचा फोन, पोलिसांनी कसून चौकशी केली, वेगळंच सत्य समोर आलं
अनेकदा सासू ,सासरे, पती तिला आमच्याशी बोलू देत नव्हते. तिला कुठल्या नातेवाईकांकडे पाठवत नव्हते, कपडे घेऊन देत नव्हते. तसेच मानसिक आणि शारीरक छळ करून मारहाण करत होते. त्या त्रासाचा अतिरेक सहन न झाल्याने अश्विनी हिने जवळ असलेल्या विहिरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेबाबत फिर्यादी यांचे दाजी योगेश चौधरी यांनी मला फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर आम्ही सर्वजण घटनास्थळी दाखल झालो तेव्हा अश्विनचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे. पहायला मिळाले. नंतर पोलिसांच्या मदतीने तो मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत अधिक तपास यवत पोलिस करत आहेत.

पुण्यात ओला, उबरची रिक्षा, सेवा बंद होणार?; आरटीओने परवाना नाकारला, कारण काय?

पुणेकर ऐकत नाय! हापूस परवडेना म्हणून थेट आंबा EMIवर, विक्रेत्याची भन्नाट कल्पना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here