नवी दिल्ली : अभिनेता मृत्यू प्रकरणात केंद्राच्या अधिसूचनेनंतर केंद्रीय अन्वेषण विभागानं (Central Bureau of Investigation – ) तपास आपल्या हाती घेतलाय. या प्रकरणात सीबीआयनं सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सीबीआयनं सुशांतची कथित गर्लफ्रेंड , इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल केलीय. सीबीआयची टीम सध्या बिहार पोलिसांच्या संपर्कात आहे.

वाचा :

वाचा :

सुशांत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयनं एका विशेष तपास पथकाची (Special Investigation Team – SIT) नियुक्ती करण्यात येतेय. हे पथक मनोज शशिधर यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास करणार आहे. पोलीस उपनिरीक्षक (Deputy Inspector General of Police – DIG) गगनदीप गंभीर हे या चौकशीवर लक्ष ठेवणार आहेत. तर चौकशीसाठी अनिल यादव यांची तपास अधिकारी (Investigating Officer) म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

दरम्यान, रिया चक्रवर्ती हिची ७ ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाकडून (Enforcement Directorate – ED) चौकशी करण्यात येणार आहे.

दुसरीकडे, बिहारचे पोलीस महासंचालक (Director General of Police – DGP) गुप्तेश्वर पांडे यांनी एका वाहिनीशी बोलताना सुशांतची पूर्व-मॅनेजर दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या हत्या प्रकरणाचा थेट संबंध असल्याचा दावा केलाय.

वाचा :

वाचा : सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात बिहारमध्ये एफआयआर दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यालाठी बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली. परंतु मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात मदत न करता अडथळे निर्माण केल्याचा आरोपी बिहार पोलिसांकडून करण्यात आलाय. बिहार पोलिसांनी यासंबंधी आपली नाराजीही व्यक्त केलीय. दरम्यान, बिहार सरकारनं या प्रकरणात चौकशीची शिफारस केल्यानंतर केंद्राकडून प्रकरणाचा तपास आता सीबाआयकडे सोपवण्यात आलाय. वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here