नवी दिल्ली :पेन्शन मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बँकांमध्ये अनेकदा फेऱ्या माराव्या लागतात. हयातीचा दाखला किंवा इतर कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पेन्शनधारकांचे मोठे हाल होतात. आता असाच धक्कादायक आणि प्रशासकीय यंत्रणेची लख्तरं वेशीवर टाकणारा प्रकार समोर आला आहे. पेन्शनसाठी एका वृद्ध महिलेचा मोठा संघर्ष एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ काही वाईट घटना पसरता. तर काही वेदनादायी आणि न्याय मिळवण्यासाठी धडपणाऱ्यांचे व्हिडिओही व्हायरल होतात. नागरिकांच्या समस्यांना या व्हिडिओंमधून वाचा फोडण्यात येते. आता एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ व्हायरला झाला आहे. हा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने ट्विट केला आहे.

पेन्शन मिळवण्यासाठी एक आजी तुटलेली खुर्ची घेऊन चालत चालत बँकेत जाताना या व्हायर व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेही अनवाणी. या वृद्ध महिलेचं नाव सूर्या हरीजन असं आहे. ही महिला एका तुटलेल्या खुर्चीच्या आधाराने पेन्शन घेण्यासाठी अनवाणी पायी चालत आहे. ही महिला बँकेत जात आहे. ही घटना ओडिशातील झारीगावमधील आहे.

कुठे उष्णतेची लाट, तर कुठे अवकाळी पाऊस! आता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली मोठी चिंता
कित्येक किलोमीटरची पायपीट करून ही महिला बँकेत पोहोचते. या प्रकरणी बँकेचे मॅनेजरने माहिती दिली. महिलेची बोटं तुटल्याने तिला पैसे काढण्यात अडचणी येत आहेत. पण आम्ही समस्या लवकरच दूर करू, अशी माहिती झारीगावमधील एसबीआयच्या मॅनेजरने दिली. एएनआयने काल रात्री ११.१० वाजता हा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ १,३३३ जणांनी आतापर्यंत रिट्विट केला आहे. त्याला ५१२२ लाइक्स आहेत आणि ४०१ जणांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

IIT इंजिनीअरनं दुबईतील नोकरी सोडली; भारतात येऊन गुन्हेगार बनला; कारण ऐकून पोलीस चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here