नवी दिल्ली : आजच्या काळात EMI वर काहीही खरेदी करणे खूप सोपे झाले आहे. विशेषत: सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोकांना विनाशुल्क (नो-कॉस्ट) EMI वर वस्तू विकत आहेत, जेणेकरून अधिकाधिक वस्तू विकल्या जाऊ शकतात आणि ग्राहकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाईल. यामुळे प्रत्येकजण आपल्या आवडीची वस्तू अगदी सहज खरेदी करतो. विशेषत: आजची तरुण पिढी या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा घेतात. पण, एक म्हण आहे की- ‘या जगात ‘फ्री लंच’, म्हणजेच मोफत जेवण असे काहीही नाही. मग लोकांना या नो-कॉस्ट ईएमआयचा फायदा कसा मिळेल? याचा खरोखरच ग्राहकांना फायदा होतो का? कंपन्या ग्राहकाला कसे अडकवतात? यामागचा संपूर्ण हिशोब काय? चला जाणून घेऊया.आज बाजारात बहुतेक ई-कॉमर्स कंपन्या त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देतात. आणि नो-कॉस्ट EMI ऑफर पाहून अनेक ग्राहकांनाही वस्तू खरेदी करण्याचा मोह अनावर होतो. खरेदी करण्याची ही चांगली संधी असल्याचे त्यांना वाटते. व्याज किंवा कोणतेही अतिरिक्त पैसे न देता ते आवश्यक असलेली वस्तू खरेदी करतील. काही महिन्यांत ते सहज पैशाची परतफेड करतील, असा त्यांचा विचार त्यांच्या खिशाचा भारी वाढतो. विशेषत: त्या ग्राहकांसाठी, जे कसून चौकशी न करता ऑफरचा फायदा घेतात. कोणताही विचार न करता नो-कॉस्ट ईएमआयने खरेदी केल्यास तुम्हाला वस्तूंच्या किमतीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.शुल्क लागू होऊ शकतातअधिकाधिक कंपन्या सणासुदीच्या काळात नो कॉस्ट ईएमआय ऑफर्स घेऊन येतात. उद्या देशभर अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाणार असून या निमित्त तुम्ही देखील खरेदीसाठी या योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. तज्ज्ञांच्या मते, ज्या गोष्टींवर ही सुविधा दिली जाते, त्यांची किंमत जास्त असू शकते. काही कंपन्या नो कॉस्ट EMI वर प्रक्रिया शुल्क देखील आकारते. या व्यतिरिक्त, तुम्हाला या पर्यायातून खरेदी केलेल्या वस्तूंसाठी डिलिव्हरी चार्ज देखील भरावा लागेल, तसेच तुम्ही सामान्य खरेदी केल्यास तुम्हाला हे शुल्क भरावे लागणार नाही.खरेदी करण्यापूर्वी हे काम करा!जर तुम्ही या योजनेचा फायदा घेत खरेदी करणार असाल तर तुम्ही पहिले योग्य आणि सविस्तर चौकशी करणे महत्त्वाचे आहे. नो-कॉस्ट EMI द्वारे कोणतीही वस्तू घेण्यापूर्वी इतर ई-कॉमर्स साइट किंवा ऑफलाइन त्या वस्तूची किंमत जाणून घ्या. ई-कॉमर्स कंपनी किंवा स्टोअरच्या अटी आणि शर्ती, कार्यकाळ, प्रक्रिया शुल्क, प्री-क्लोजर फी, प्रीपेमेंट दंड आणि उशीरा पेमेंट शुल्क याबद्दल माहिती असल्याची खात्री करा. हे सर्व पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की या योजनेमुळे तुमचे पैसे खरोखरच वाचले जात आहेत की वस्तू विकण्यासाठी नो कॉस्ट ईएमआयच्या नावाखाली तुमची फसवणूक केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here