नागपूरः सहकारी महिला कार्यकर्त्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी पक्षाच्या कार्यकर्त्याविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सोहेल पटेल वय ५५ रा.जाफरनगर,असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

सोहेल हा विवाहित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८मध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात सोहेल याची विवाहित असलेल्या पीडित ४६ वर्षीय महिला कार्यकर्त्यासोबत ओळख झाली. त्यानंतर तो महिलेच्या घरी जायला लागला. जानेवारी २०१९मध्ये तो महिलेच्या घरी गेला. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने पीडित महिलेवर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने पीडित महिलेने याबाबत कोणालाही सांगितले नाही.

त्यानंतर सोहेल याने भंडारा व नागपुरातील अन्य ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तिला लग्नाचेही आमिष दाखविले. तो वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असल्याने महिलेने पाचपावली पोलिसांत तक्रार दिली. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोहेल हा पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here