नवी दिल्ली :देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. नवी दिल्लीतील एका कोर्टात गोळीबाराची घटना घडली आहे. नवी दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेवर आरोपीनं गोळीबार केल्यानं खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीतील साकेत कोर्ट परिसरात हल्लेखोरानं चार राऊंड फायर केले. यामध्ये संबंधित महिलेला तीन गोळ्या लागल्या आहेत. महिलेच्या पोटात दोन गोळ्या लागल्या असून तिच्या हातात एक गोळी लागली आहे. महिलेला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वकिलांच्या ड्रेसमध्ये हल्लेखोर आलेला

आरोपीनं वकिलाच्या ड्रेसमध्ये कोर्टाच्या न्यायालयात प्रवेश केला होता. आरोपीनं महिलेवर गोळीबार केल्यानंतर तो फरार झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु करण्यात आली आहे. घटनास्थळी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. दिल्लीतील कोर्टातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून न्यायालयाच्या आवारात घडणाऱ्या घटनांमुळं सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी या घटनेसंदर्भात तपास सुरु केला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर आरोपीची ओळख पटवली आहे. मात्र, गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाला होता.

प्राथमिक माहितीनुसार आरोपी काळी कपडे घालून आला होता. संधी मिळताच त्यानं गोळीबार केला. जखमी झालेल्या महिलेचा तिच्या पतीसोबत वाद सुरु होता. ती आज साक्ष देण्यासाठी कोर्टात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीची ओळख पटवण्यात आली आहे. आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.

बी.एस्सी अ‍ॅग्री सूनबाईचं मार्गदर्शन,सासऱ्यांनी अनुभव पणाला लावला,चिया शेतीचा भन्नाट प्रयोग अन् लाखोंची कमाई
घटनास्थळावर उपस्थित असलेल्या राजेंद्र झा यांनी हल्लेखोराचं नाव कामेश्वर सिंह उर्फ मनोज सिंह असल्याची माहिती दिली. अखिल चक्रवर्ती यांनी गोळीबार करताना कामेश्वर सिंह याला पाहिल्याचं म्हटलं. जखमी महिलेचं नाव राधा असल्याची माहिती आहे. गोळीबार होण्यापूर्वी दोघांमध्ये वाद सुरु होता. दोघांची त्याठिकाणी धक्काबुक्कीदेखील झाली.

आधार कार्ड लिंक करूनही अनुदान मिळेना; शेतकरी वैतागला, PM Kisan योजनेचं पोर्टल पाहून उडालाच

प्राथमिक माहितीनुसार तीन ते चार राऊंड फायर झाल्या. या प्रकरणी डीसीपी दक्षिणचे चंदन चौधरी यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर साकेत कोर्ट परिसरात खळबळ उडाली होती. या निमित्तानं कोर्टाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर, सुषमा अंधारेंचे आठ खरमरीत सवाल

घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here