मुंबई :आयफोन आणि मॅकबुक बनवणारी दिग्गज अमेरिकन टेक कंपनी ॲपलने मंगळवारी म्हणजेच १८ एप्रिल २०२३ रोजी भारतात पहिले अधिकृत रिटेल स्टोअर उघडले. याशिवाय दिल्लीत एक रिटेल स्टोअरही उघडण्यात आले आहे. मुंबईतील ब्रँडचे रिटेल स्टोअर कुर्ला कॉम्प्लेक्स, जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉल येथे तर दिल्लीतील साकेत सिटी वॉक मॉल येथील स्टोअरचे उद्घाटन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. दिल्ली आणि मुंबईच्या दुकानांचे भाडे जवळपास सारखेच आहे. पण दिल्लीचे दुकान मुंबईच्या दुकानाच्या निम्म्याहून कमी आहे.

ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी दिल्ली स्टोअरच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याशिवाय टिम कुक यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांचीही भेट घेतली. मुंबईचे रिटेल स्टोअर सुरू होण्यापूर्वी टिम कुक यांनी मुंबईत माधुरी दीक्षित, अरमान मलिक, अनिल कुंबळे यांसारख्या सेलिब्रिटींची भेट घेतली तसेच त्यांनी मुकेश अंबानींच्या घरी अँटिलियालाही भेट दिली.

Tim Cook: ॲपलचे CEO टिम कुक यांनी घेतली पीएम मोदींची भेट, भारताला दिली ही भेट
किती संपत्ती
फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, ६२ वर्षीय टिम कुक यांची संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स म्हणजेच १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कुक यांना २०२२ या वर्षात ९९.४ दशलक्ष डाॅलर (८१५ कोटी रुपये) मिळाले. यामध्ये ३ दशलक्ष डाॅलर पगाराचा समावेश आहे. याशिवाय ८३ दशलक्ष डाॅलरचा स्टॉक अवॉर्ड आणि बोनस देखील मिळाला. २०२१ मध्ये मिळालेल्या रकमेपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. २०२१ मध्ये कुक यांना ९८.७ दशलक्ष डाॅलर मिळाले.

दिवसाला किती कमावतात
टिम कुक २०११ मध्ये सीईओ बनल्यापासून २३५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅपसह जगातील सर्वात श्रीमंत टेक कंपनी बनली आहे. टिम कुक यांना २०१८ मध्ये बोनस म्हणून ८४ कोटी रुपये मिळाले. ॲपलचे सीईओ म्हणून वर्ष २०२२ मध्ये टिम कुक यांचे वार्षिक पॅकेज ९९.४ दशलक्ष डाॅलर म्हणजेच ८१५ कोटी रुपये होते. त्यानुसार त्यांची एका दिवसाची कमाई २.२३ कोटी रुपये होती. पण २०२३ मध्ये टिम कुक यांनी स्वतःचे वार्षिक पॅकेज ४०२ कोटी रुपये कमी केले. त्यानुसार आता त्यांची एका दिवसाची कमाई १.१० कोटी रुपये आहे.

कोण आहेत Apple चे सीईओ टिम कूक; संपत्ती आणि प्रवास जाणून थक्क व्हाल
ॲपल एकेकाळी बुडण्याच्या मार्गावर
ॲपलसाठी टिम कूक लकी मानली जाते. कूक १९९८ मध्ये जेव्हा ॲपल कंपनीत रुजू झाले, त्या काळात कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. २००० मध्ये कुक ॲपलचे विक्री आणि व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष बनले. यानंतर २००४ मध्ये त्यांनी अंतरिम सीईओ आणि मॅकिंटॉश विभागाचे प्रमुखपद भूषवले. २००९ मध्ये स्टीव्ह जॉब्स प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर गेले, त्यावेळी कुक यांना अंतरिम सीईओ म्हणून घोषित करण्यात आले. ऑगस्ट २०११ मध्ये स्टीव्ह जॉब्सच्या मृत्यूनंतर टिम यांना ॲपलचे सीईओ बनवण्यात आले.

मुंबईत Apple स्टोअरच्या कार्यक्रमात टिम कूक यांना मिळाली खास भेट, पाहून ॲपल CEO चक्रावले
यशाचे रहस्य काय
टिम कुक पहाटे ३.४५ ला उठतात आणि ते उठल्यावर पहिली गोष्ट करतात ती म्हणजे ग्राहकांचे अभिप्राय आणि ई-मेल वाचणे. पण टिम कुक सकाळी हे का वाचतात? यालाही त्यांनी उत्तर दिले आणि सांगितले की, सकाळी ग्राहकांचे अभिप्राय वाचून त्यांना प्रेरणा मिळते आणि लोकांच्या फीडबॅकमुळे त्यांना नवीन उत्पादनांवर चांगले काम करण्यास मदत होते. यानंतर ते पहाटे पाचच्या सुमारास जिममध्ये जातात.

Oneplus New Mobile | फास्ट चार्जिंग सपोर्टसह OnePlus चा नवा फोन लॉन्च | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here