पुणे (पिंपरी-चिंचवड): पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड परिसरात स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री अचानक छापा टाकत ही कारवाई केली आहे. पोलिसांनी स्पा सेंटर मालक असलेल्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी महिला पोलिसांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील दत्त मंदिर रोडवर कनक नावाचा स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खोटे कस्टमर पाठवून वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती घेतली. त्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून संबधित स्पा सेंटर चालवत असलेल्या महिलेला ताब्यात घेतले असून त्यातून चार पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे.

ते जगाचे नेते, भाजपच्या पोपटांना पोपटपंची करु द्या; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
मसाज सेंटरच्या नावाखाली या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले असून पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन त्यातून संबंधित महिला ही तिची उपजीविका चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अशी माहिती पोलिस अधिकारी माने यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड आणि परिसरात स्पा सेंटरचे प्रमाण वाढले असून यातून अनेक महिलांना वेठीस धरून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असून अनेक प्रकरणे यातून समोर येत आहेत. अशा घटनांना आळा बसवणे गरजेचे असून यातून पीडित महिलांना त्रास सहन करत हा व्यवसाय करावा लागत आहे. या घटनेने वाकड पोलिस याचा अनेक अंगाने तपास करत आहेत.

आले १००, गेले १०० ‘चतुर’ अजिंक्य एक नंबर; IPL मध्ये कोणालाच जमला नाही असा पराक्रम केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here