जळगाव:तरुणीने ऑनलाईन साडी मागविली, त्या साडीचे स्टेटस चेक करण्यासाठी तरुणीने कुरीयर कंपनीच्या संकेतस्थळावर जावून कॉलसेंटरला संपर्क साधला आणि हाच संपर्क साधणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. फोनवर बोलणाऱ्यांनी विश्वास संपादन करत तिला अर्ज भरायला सांगितला. तिची तब्बल १ लाख २४ हजार ७५४ रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्वाती विठ्ठल तायडे (वय ३३) या तरुणीची फसवणूक झाली आहे.जळगाव शहरातील जुन्या एमआयडीसीतील एम.एस.ई.बी. कॉलनीत स्वाती विठ्ठल तायडे या वास्तव्यास आहेत. स्वाती तायडे ही तरूणी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. स्वाती तायडेने १ एप्रिल रोजी ऑनलाईन साडी ऑर्डर केली होती. ही साडी ३ एप्रिल रोजी बी टू सी स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हिस कंपनीद्वारे मिळणार होती. पण, ७ एप्रिल तारीख येऊनही साडी मिळाली नाही. त्यामुळे या साडीची डिलेव्हरी स्टेटस चेक करण्यासाठी ७ एप्रिल रोजी स्वाती तायडे यांनी बी टू स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हिस या कुरिअर कंपनीच्या वेबसाईटवर पाहणी केली असता, डिलेव्हरी पेंडिंग दिसून आली. म्हणून स्वाती तायडे यांनी कुरिअर कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला.

भलतचं! ऑनलाईन शॉपिंगमध्ये वन प्लस मोबाईल ऐवजी डमी फोम अन् साबणाच्या वड्या

फॉर्म भरायला सांगितला अन् काही वेळात बँकेचे खाते झाले रिकामे

त्यावेळी त्या व्यक्तीने स्वाती तायडे यांना तुमचा पत्ता सापडत नसल्यामुळे पार्सल पेडिंग दिसत असल्याचे सांगून कंपनीच्या लिंकवर जाऊन एक फॉर्म भरण्यास सांगितला. त्यानुसार तरूणीने संपूर्ण फॉर्म भरला. दरम्यान, फॉर्म भरल्यानंतर काही मिनिटानंतर तरूणीला तिच्या खात्यातून पैसे कपातीचे मेसेज प्राप्त झाले. क्रेडीट कार्ड आणि बँक खात्यातून पैसे कपातीचा मेसेज आल्यानंतर तरूणीला शंका निर्माण झाली.

काम करताना खाली पडला, थरथर कापू लागला अन् क्षणात मृत्यू, CCTV फुटेज पाहून अंगावर काटा येईल
तरूणीने ऑनलाइन खात्यातील रक्कम तपासल्यानंतर त्यातील रक्कम कमी झालेली दिसून आली. काही वेळानंतर पुन्हा तिने ऑनलाइन बॅलेन्स तपासल्यानंतर तब्बल १ लाख २४ हजार ७५४ रूपये खात्यात नसल्याचे दिसून आले. अखेर बुधवारी स्वाती तायडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार फोनवर बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय गिरधर बडगुजर हे करीत आहेत.

पप्पाला मारलं, आता मुंबईला जाणार; दारुच्या नशेत कानावर पडले शब्द, असा झाला खुनाचा उलगडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here