पुणे :महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात विविध मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळी काय घडलं यासंदर्भात अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते सकाळ माध्यम समुहाच्या ‘दिलखुलास दादा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

सध्याचे राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कानावर यायचं, ते नाराज असल्याचं कानावर यायचं. आम्ही शरद पवार साहेबांना सांगायचो. आम्ही उद्धव ठाकरे यांना देखील सांगितलं होतं. उद्धव ठाकरे यांचं सरकार महाराष्ट्रात आलेल्या दिवसापासून भाजप ते सरकार जावं म्हणून पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत होते. ते एका दिवसात झालेलं नव्हतं, असं अजित पवार म्हणाले.

आम्ही अनेकदा सांगत होतो. आमच्या हातात राज्य असताना काही काही बाबी अशा झाल्या की ठाणे आणि त्या भागात अधिकारी नेमण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्यामुळे जेव्हा २० जूनला मतदानाच्या दिवशी बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी आणून ठेवलेल्या अधिकाऱ्यांनी सूरतच्या दिशेन सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम केलं होतं. ते मुंबईहून निघाले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन केले एकनाथ शिंदे यांना परत आणा,पण अधिकारी एकनाथ शिंदे यांना लॉयल राहिले. पुढं मग गुवाहाटी, गोवा हे काय घडलं ते आपल्या सर्वांना माहिती आहे.

CSK vs SRH Live Score: चेन्नई आणि हैदराबादच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स
आपल्या जीवाभावाचे सहकारी सोडून गेल्यानं उद्धव ठाकरे यांना धक्का बसला होता.२०१९ मध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला होता त्यावेळी तिन्ही पक्षांनी जे जबरदस्त काम केलं होतं. तसं त्यावेळी देखील केलं असतं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते, असं अजित पवार म्हणाले.

IPL 2023 च्या फायनलचं ठिकाण ठरलं… पाहा कुठे आणि कधी होणार आयपीएलची अंतिम फेरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जे ५४ आमदार निवडून आले होते त्यापैकी बहुतांश आमदारांनी मला उपमुख्यमंत्री पदी संधी द्यावी, अशी भूमिका घेतली होती, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपमध्ये जाण्यासंदर्भात भूमिका घेणारा कोणाताही दबावगट नाही, असं अजित पवार म्हणाले.

करोना महामारी संपलेली नाही सतर्क राहा, केंद्राचा ८ राज्यांना इशारा,महाराष्ट्राचाही समावेश, पत्रात काय म्हटलंय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here