आंबेगाव, पुणे :ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मयत मुलं पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी होते. आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात हद्दीवर असणाऱ्या शिरोली सुलतानपूर गावच्या हद्दीत अंगावर शहारे आणणारी ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरा हा अपघात झाला.कुणाल मच्छिंद्र भोर (वय १६ वर्ष), ओम दत्तात्रय भोर (वय १६ वर्ष) हे दोघे जण ट्रॅक्टर खाली येऊन ठार झाले आहेत. तर, पार्थ सुदर्शन भोर (वय १७ वर्ष, सर्व जण रा. रांजणी ता.आंबेगाव) हा यात गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील शिरोली, सुलतानपूर गावच्या हद्दीत हे तिघे मित्र ट्रॅक्टर दुरुस्त करण्यासाठी घेऊन चालले होते. यावेळी कुणाल भोर ट्रॅक्टर चालवत होता. काही अंतर गेल्यानंतर त्याचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला. यामध्ये ट्रॅक्टरच्या खाली येऊन कुणाल मच्छिंद्र भोर व ओम दत्तात्रय भोर हे दोघे जण जागीच ठार झाले. तर पार्थ सुदर्शन भोर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लग्नानंतर तीन महिन्यात साथ सुटली, मशिन सुरु करताच विजेचा धक्का, नवविवाहित तरुणाचा करुण अंत
हा अपघात एवढा भयानक होता की, ट्रॅक्टर खाली आलेल्या दोन्ही मुलांचा चेंदामेंदा झाला होता. अचानक घडलेल्या या घटनेने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी

याबाबत अशोक भोर यांनी मंचर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे. ट्रॅक्टर चालवणारा मुलगा हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. पार्थ सुदर्शन भोर हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मंचर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माऊलीमुळे मृत्यूला चकवा; आईने बसमधून उतरवलं, बोरघाट अपघातातून आराध्य बालंबाल बचावला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here