नवी दिल्ली : अयोध्येत सोहळा पार पडल्यानंतर हिंदुत्ववाद्यांकडून आता नवीन मागणी पुढे आलीय. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानंतर प्रतिक्रिया देताना ‘अयोध्येनंतर काशी आणि मथुरेलाही मुक्त करायचंय’ असं विधान आखाडा परिषदेचे अध्यक्ष यांनी केलंय. सोबतच, ‘जर हे असेल तर भारत का होऊ शकत नाही’, असा प्रश्न महंत नरेंद्र गिरी यांनी विचारलाय. इतकंच नाही तर ‘ राम जन्मभूमिची लढाई आता संपुष्टात आलीय. आता काशी आणि मथुरेला मुक्त करण्याची वेळ आलीय’ अशा सूचक शब्दांत त्यांनी आपली भविष्यातील वाटचाल बोलून दाखवली.

हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विधानावर पलटवार करताना महंत नरेंद्र गिरी यांनी हे विधान केलंय. ‘खरं म्हणजे हे हिंदू राष्ट्रच आहे परंतु, इथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो’ असंही नरेंद्र गिरी यांचं म्हणणं आहे.

वाचा :

वाचा :

वाचा :

‘इतर धर्मांचं आचरण करणाऱ्यांनाही आम्ही सनातनी सन्मान करतो, त्यांची गळाभेट घेतो त्यांच्या प्रती आस्था राखतो. परंतु, जेव्हा कुणी आमच्या धर्माला आव्हान देतं आणि अपमानजनक शब्दांचा उच्चार करतं तेव्हा आम्ही त्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी नेहमी तयार असतो’ असंही महंत गिरींनी म्हटलंय.

राम मंदिराचं निर्माण संविधानाच्या कक्षेत राहूनच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारलेलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि राम मंदिर ट्रस्टच्या आमंत्रणानंतरच अयोध्येला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केलं मंदिर निर्माणासाठी हिंदुंनी शेकडो वर्ष प्रतिक्षा केली आणि न्यायालयाच्या निर्णयाचीही प्रतिक्षा केली, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निर्णयाचं कौतुक केलं.

काशी आणि मथुरा हा हिंदुंसाठी कलंक आहे. तो मिटवणं आता गरजेचं आहे, असं म्हणतानाच गिरी यांनी शांतीपूर्ण पद्धतीनं आंदोलन आणि न्यायप्रक्रियेतूनच लढाई लढत काशी आणि मथुरेला मुक्त करण्याचं आवाहन केलंय.

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here