बिजिंग:काही काळापूर्वी हाँगकाँगमधील एका तलावातून एक विचित्र प्राणी बाहेर आला होता. या प्राण्याला २४ डोळे होते. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्राणी प्रत्यक्षात अत्यंत विषारी जेलीफिशच्या नवीन प्रजातीचा सदस्य आहे. या प्राण्याचे शरीर एक इंचापेक्षा कमी लांबीचे आहे आणि तो पारदर्शक आहे. हाँगकाँगच्या माई पो रिझर्व्हमधील एका लहान तलावात हा प्राणी आढळला होता. त्याचे तीन लांब-लांब पाय आहेत, जे पसरल्यावर १० सेमी पर्यंत वाढू शकतात. बॉक्स जेलीफिशची ही एक नवीन प्रजाती आहे. या प्राण्याला २४ डोळे आहेत, जे प्रत्येकी चारच्या सहा गटांमध्ये विभागलेले आहेत.या प्राण्यामुळे अर्धांगवायू, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो

त्याचे डोळे त्यांच्या अवयवांमध्ये लपलेले असतात, याला rhopalium म्हणतात. बॉक्स जेलीफिशला त्याच्या शरीरावरून हे नाव देण्यात आले आहेत. त्याचे लांब आणि पातळ पाय आहेत, ज्यातून हा प्राणी विष सोडतो. त्याच्या विषामुळे अर्धांगवायू, हृदयविकाराचा झटका आणि काही मिनिटांत मृत्यूही होऊ शकतो. या जेलीफिशची जवळची प्रजाती ऑस्ट्रेलियन बॉक्स जेलीफिश आहे, जी जगातील सर्वात विषारी सागरी प्राण्यांपैकी एक आहे.

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

जगातील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक

क्युबोझोआ वर्ग, ज्याला त्याच्या चौकोनी आकारामुळे सामान्यतः बॉक्स जेलीफिश म्हणून ओळखले जाते, असं गेल्या महिन्यात झूलॉजिकल स्टडीज या शैक्षणिक जर्नलमध्ये प्रकाशित केलेले संशोधन लिहिले आहे. त्याच्या सुमारे ५० प्रजाती आहेत. ही जेलीफिश जगातील सर्वात विषारी प्राण्यांपैकी एक आहे. हाँगकाँग बॅप्टिस्ट युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या पथकाने तीन वर्षे जेलीफिशचा अभ्यास केला आणि माई पो नेचर रिझर्व्ह येथील तलावात कोळंबीपेक्षा जास्त जेलीफिश असल्याचे आढळून आलं आहे.
हॉटेलच्या खोलीत २८ वर्षीय वकिलाचा मृतदेह, जवळच चिठ्ठी सापडली; दार उघडताच सारे हादरले…
एकमेव प्रजाती, सध्या फक्त चीनमध्ये

जेलीफिशची ही प्रजाती या प्रदेशातील एकमेव अशी प्रजाती आहे. शास्त्रज्ञांनी रिझर्व्हच्या सन्मानार्थ याला ट्रिपेडेलिया मायपोएन्सिस असे नाव दिले गेले आहे. प्रमुख संशोधक प्रोफेसर किउ जियानवेन यांनी सांगितले की, ‘ही प्रजाती सध्या फक्त माई पोमध्ये आढळते.’ तरी त्यांना असं वाटतं की जेलीफिशची ही प्रजाती दूरवरही आढळू शकते. हा शोध अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे, कारण हा जेलीफिश चीनच्या पाण्यात प्रथमच दिसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here