हा शेअर्स टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडियाचा आहे. व्होडाफोन-आयडिया शेअर्सच्या गुंतवणूकदारांसाठी शुक्रवार, आठवड्यातील शेवटचा व्यवहार दिवस मोठा दिलासा ठरला. दीर्घ घसरणीनंतर गेल्या आठवडाभरापासून त्यात वाढ सुरूच राहिली. गुरुवारी व्होडा-आयडियाबाबत एक मोठी बातमी समोर आली, ज्यामुळे शेअर्समध्ये वाढ झाली. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये सुमारे ७% वाढ झाली असून सकाळच्या सत्रात शेअर्समध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली. व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सने दिवसभरातील उच्चांकी ६.६५ रुपयांवर झेप घेतली. दिवसाअखेरीस शेअर्स वाढीसह ६.४५ रुपयांवर बंद झाला.
व्होडाफोन आयडियाचे शेअर्स का वाढले?
प्रसिद्ध अब्जाधीश कुमार मंगलम बिर्ला व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सच्या वाढीमागील मुख्य कारण ठरले. कंपनीने कुमार मंगलम बिर्ला यांची संचालक मंडळावर पुन्हा एका नियुक्ती केली. तर बिर्ला यांची दोन वर्षांपूर्वी व्होडाफोन-आयडियाच्या संचालक मंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. यांनतर त्यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आता ते परत येताच शेअर्समध्ये पुन्हा एकदा बंपर बाउन्स पाहायला मिळत आहे. कुमार मंगलम बिर्ला व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळात अतिरिक्त संचालक म्हणून गैर-कार्यकारी आणि स्वतंत्र भूमिकेत सामील झाले आहेत.
१९% घसरला
या वर्षी व्होडाफोन आयडियाचा शेअर्स १९ टक्क्यांनी घसरला मात्र, गेल्या एका महिन्यात शेअर्समध्ये २.३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. व्होडाफोन आयडिया शेअर्सची किंमत १० एप्रिल २००५ रोजी ११८ रुपये होती. तेव्हापासून शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत शेअर्स ८४.४८ टक्के घसरला आहे. एका वर्षात त्यात ३५.१८% घट झाली असून आता गुंतवणूकदारांना या शेअर्समध्ये पुन्हा तेजीची आशा आहे.
कुमार मंगलम बिर्ला-व्हिट्टोरियो कोलाओ; एक्सक्लुझिव्ह मुलाखत