नाशिक : शहरासह ग्रामीण भागातील गुन्हेगारीने आता डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील हरसूल जवळ असलेल्या माळेगाव येथे पाच जणांनी मिळून सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. पोलीस तपासात हत्या झालेला तरुण सराईत असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत आदित्य श्याम डोकफोडे (२२, रा. गिरणारे) असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. तर या प्रकरणी संशयित सोपान बोबडे (२५, रा. गिरणारे) याला हरसूल पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोपान्याच्या भावावर हल्ला केल्याच्या रागातून आदित्यचा खून करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्यचा खून सोपान आणि त्याच्या चार साथीदारांनी मिळून मारहाण करत माळेगाव शिवारात केला. याआधी बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास आदित्य डोकफोडे आणि इतर दोघांनी गिरणारे परिसरात सूरज नंदू बोबडे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात आदित्यसह तिघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चुकीला माफीला नाही! नाशिकमधील वादग्रस्त पोलिस अंमलदार बडतर्फ; आयुक्तांची कठोर कारवाई
दरम्यान, आदित्यने भावावर प्राणघातक हल्ला केल्याने सोपान आणि इतरांनी मिळून माळेगावजवळ लाकडी दांडा आणि कोयत्याच्या साहाय्याने वार करून आदित्यचा खून केला. भावावर हल्ला केल्याच्या रागातून सोपान बोबडे आणि इतर संशयितांनी आदित्यचा पाठलाग करत हल्ला करत त्याला संपवलं. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणी हरसूल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणातील संशयित सोपानला अटक केली आहे.

शेतीनं थकवलं म्हणून कुक्कुटपालन केलं, पण अवकाळीमुळे क्षणात सारं उद्ध्वस्त झालं

आपापसातील वादातून किंवा पूर्ववैमान्सातून अनेक खुनाच्या घटना घडत असतात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरात झालेली खुनाची घटना देखील भावावर प्राणघातक हल्ला केल्याच्या रागातून तरुणाला थेट संपवण्यात आलं आहे. या बावीस वर्षीय तरुणावर लाकडी दांडक्याने आणि कोयत्याने हल्ला झाल्याने तो गंभीर जखमी झाल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here