सुशांतसिंह राजपूत याच्या वडिलांनी बिहारमध्ये सुशांत आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचं एक पथक मुंबईत आलं होतं. या पथकाने तपासही सुरू केला होता. काही दिवसानंतर लगेचच एसपी विनय तिवारीही या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले होते. मात्र मुंबईत येताच तिवारी यांना पालिकेने १४ दिवसांसाठी केलं होतं. त्यांना या १४ दिवसात बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. शिवाय क्वॉरंटाइनबाबतचे सरकारी नियमही दाखविण्यात आले होते. त्यामुळे बिहरा विरुद्ध मुंबई पोलीस असा संघर्ष निर्माण होऊन मोठा गदारोळ झाला होता.
या घटनेचे राजकीय पडसादही उमटले होते. मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप झाला होता. बिहार पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने करू नये म्हणूनच तिवारी यांना क्वॉरंटाइन करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही तिवारी यांना महाराष्ट्रात चांगली वागणूक मिळाली नसल्याची खंत व्यक्त करत हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. तर बिहारचे डिजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पालिकेला तिवारी यांची क्वॉरंटाइनमधून मुक्तता करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर बिहार सरकरने सुशांतसिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. ती मान्यही केल्या गेली. सीबीआयनेही याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मुंबई पोलिसांसाठी हा सर्वात मोठा झटका होता. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर तिवारी यांचा क्वॉरंटाइन पीरियड रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासासंदर्भात मुंबईत दाखल झालेले बिहारचे पोलिस पथक गुरुवारी स्वगृही परतले. मुंबईत तपासासाठी पथकाने पुरावे, जबाब गोळा केले आहेत. सुशांतसिंह आत्यहत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यास आणखी वेगळे वळण लागले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
These are actually great ideas in concerning blogging.
Thank you ever so for you article post.
Like!! Thank you for publishing this awesome article.