नवी दिल्ली :आज देशभरात अक्षय्य तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी केल्याने घरात समृद्धी नांदते, असे मानले जाते. त्याचबरोबर लोक या निमित्ताने हिऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकही करतात. जर तुम्ही देखील आजच्या या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लक्षात घ्या की काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सध्या बाजारात बनावट सोन्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स नक्कीच फॉलो करा.

हॉलमार्क चेक करा!
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आधी तुम्ही खरेदी करत असलेले नाणे किंवा दागिन्यांवर हॉलमार्क आहे की नाही ते तपासले पाहिजे. १ एप्रिल २०२३ पासून सरकारने सर्व दागिन्यांसाठी सहा अंकी हॉलमार्क अनिवार्य केले असून कोणताही दुकानदार ६ अंकी हॉलमार्क शिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर SBIची खास ऑफर, सोने खरेदीवर मिळवा मोठी सूट… संधी सोडू नका!
मेकिंग चार्जेस (घटनावळ) पाहा
सोने खरेदी करताना मेकिंग चार्जेस किंवा घटनावळ तपासणे अत्यंत आवश्यक असते. वेगवेगळे ब्रँड आणि दुकानांनुसार मेकिंग चार्ज बदलतो. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ज्वेलर्स आणि ब्रँड मेकिंग चार्जेसवर ५०% पर्यंत प्रचंड सूट देतात. अशा स्थितीत दागिने तपासूनच खरेदी करा ज्यामुळे तुमचे पैसेही वाचतील.

सोन्याची किंमत तपासा
जेव्हाही तुम्ही सोने खरेदीला जाल तेव्हा आजच्या सोन्याची किंमत नक्की तपासून घ्या. प्रत्येक राज्य आणि शहरानुसार सोन्याची किंमत बदलते, त्यामुळे योग्य किंमत पाहूनच घराबाहेर पडा. तसेच तुम्ही तुमच्या शहरातील दुकानदारांना फोन करून नवीन सुधारित किंमती जाणून घेऊ शकता. यामुळे मदतीने तुम्ही खरेदी करताना दागिने आणि शुल्क दोन्ही जाणून घेऊ शकाल.

सोने विकून पैसे कमवा अन् करही वाचवा, टॅक्स सूट हवी असेल तर जाणून घ्या आयकर नियम
बिल घ्यायला विसरू नका
सोने खरेदी करताना त्याचे बिल नक्की घ्या. तुम्ही दागिने नंतर विकल्यास तुम्हाला त्या दागिन्यांवर किती भांडवली नफा झाला आहे हे कळायला हवे. आणि त्यासाठी बिल असणे आवश्यक आहे. बिलात सोन्या-चांदीची शुद्धता, वजन आणि किंमत असे अनेक तपशील दिले जातात, जे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सोन्या-चांदीचं वजन पाहून घ्या
मौल्यवान धातूंची खरेदी करताना त्यांच्या किंमतीसह वजनही तपासणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्ही खरेदी करत असलेल्या सोन्याची शुद्धता लक्षात ठेवा. सोने २४ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट आणि १६ कॅरेटचे देखील असू शकते. सामान्यतः दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. पण सोन्याची शुद्धता जितकी जास्त तितकी त्याची किंमत जास्त असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here