दरम्यान, कल्याणी यांनी बहिणीचे आरोप फेटाळले असले तरी हा वाद आता लगेच मिटताना दिसत नसताना आता या संपूर्ण प्रकरणाबाबत सुगंधाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
बाबा कल्याणी आणि सुगंधा हिरेमठ यांच्यातील वाद काय?
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार फेब्रुवारी २०२३ नंतर दोघं भाऊ-बहिणीच्या सुरू झाला. बाबा कल्याणी आणि सुगंधा हिरेमठ यांच्या आईचे २५ फेब्रुवारी २०२३ रोजी निधन झाले. अशा स्थितीत आईच्या मृत्यूनंतर १९९४ मध्ये झालेल्या करारानुसार कल्याणीने संपूर्ण हिस्सा तिच्याकडे हस्तांतरित करायला हवा होता. पण त्याऐवजी ते आपला हिस्सा वाढून त्यांना आणि त्यांच्या पतीला हिकल कंपनीतून हाकलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा सुगंध यांनी आरोप केला. दरम्यान, बाजारात उपलब्ध माहितीनुसार हिकलचे मार्केट कॅप ३५०० कोटी रुपये आहे.
हिकालमध्ये कोणाचा किती हिस्सा?
सुगंधा हिरेमठ यांची हिकालमध्ये ३५% तर बाबा कल्याणी यांची ३४% भागीदारी आहे. सुगंधा यांनी म्हटले की आईच्या मृत्यूनंतर बाबा कल्याणी कंपनीचे अतिरिक्त ५८ लाख शेअर्स खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला असून या अंतर्गत बाबा कल्याणीला १५८ कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. अशा स्थितीत तिचा भाऊ बाबा कल्याणी तिला कंपनीतून बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप ७१ वर्षीय सुगंधाने केला.
ताजमहाल हॉटेलमध्ये करार झाला
ईटीच्या रिपोर्टनुसार, १९ जून १९९४ रोजी मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीनंतर करार झाला होता. याअंतर्गत ‘हिकाल’चे शेअर्स हिरेमठ यांना हस्तांतरित केले जाणार होते, असा दावा सुगंधा यांनी केला. हिकालचे संस्थापक जयदेव हिरेमठ, त्यांची आई, भाऊ कल्याणी आणि ICICI बँकेचे तत्कालीन अध्यक्ष एन. वाघुल आणि सेबीचे माजी अध्यक्ष एस.एस. नाडकर्णी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी आहेत. मात्र, बाबा कल्याणी सुगंधाचे आरोप फेटाळत आहेत. अशा स्थितीत प्रकरण न्यायालयात पोहोचले असून आता हा वाद कोणत्या दिशेने वळतो हे पाहावे लागेल.
ब्रिटनमधील ४ पैकी ३ श्रीमंत भारतीय