परभणी : परभणीत एका शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेचं असलेलं कर्ज कसं फेडावं या विचारात असतानाच शेतकरी शेतामध्ये म्हैस चरण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र त्यावेळी त्यांनी म्हशीच्या गळ्यातील कासरा सोडून लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील लिंबा येथे घडली आहे.

४५ वर्षीय बाळासाहेब काशिनाथ दळवी असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील लिंबा येथे राहणाऱ्या बाळासाहेब किसन दळवी हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांचं दोन एकर शेत आहे. शेतामध्ये उत्पन्न कमी मिळत असल्याने त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या शाखेकडून कर्ज घेतलं होतं. बाळासाहेब दळवी मागील काही दिवसापासून अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करताना शेतातील पिक हातातून गेल्यामुळे बँकेचं कर्ज कसं फेडावं या विवंचनेमध्ये होते.

भावावरील हल्ल्याचा बदला; मित्रांसह कोयत्याने वार करून २२ वर्षीय तरुणाची हत्या, नाशिकमध्ये खळबळ
कर्ज कसं फेडावं या विचारात असताना आपली म्हैस सकाळी शेताजवळ असलेल्या गोदावरी नदीपात्रामध्ये चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्याचेवेळी त्यांनी म्हशीच्या गळ्यात असलेला कासरा सोडून गावाजवळील बाबुराव झाटे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!

आत्महत्या केलेल्या बाळासाहेब दळवी यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन मुलं आसा मोठा परिवार आहे. या घटनेने मूळ लिंबा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

वातावरण बदलामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलं आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्याच्या हाता – तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्याच चिंतेतून शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं. संपूर्ण कुटुंबाला मागे टाकून शेतकऱ्याने उचललेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here