नवी दिल्ली :आज देशभरात रमजान ईद साजरी केली जात आहे. मात्र, जम्मू काश्मीरमधील एका गावानं वेगळा निर्णय घेतला आहे. आज त्या गावात ईदचा उत्साह दिसत नाही. जम्मू काश्मीरमधील गावकऱ्यांनी यंदा ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सैन्यदलाच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान शहीद झाले होते. शहीद जवान ट्रकमधून इफ्तार पार्टीसाठी फळं आणि इतर वस्तू घेऊन पुंछमधील संगियोते गावात निघाले होते.

इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राच्या बातमीनुसार बालाकोटमधील राष्ट्रीय रायफल्सच्या बसूनी मुख्यालयातून ट्रकमधून साहित्य पोहोचवण्यात येत असते. त्यामुळं राष्ट्रीय रायफल्सचे जवान या भागात तैनात असतात.

संगियोते गावाचे सरपंच मुख्तियाज खान यांनी दुर्दैवी घटनेत आपले पाच जवान शहीद झाले आहेत, आता कसला इफ्तार असं म्हटलं. आम्हाला ग्रुपवर दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली आणि गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारच्या दिवशी केवळ नमाज पठण करण्यात येईल, गावातील लोक ईद साजरी करणार नाहीत, असंही ते म्हणाले.

जळालेल्या ट्रकचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये प्लास्टिकचा क्रेट, टरबूज, सफरचंद आणि इतर वस्तू दिसत होत्या, असं सरपंच मुख्तियाज खान म्हणाले. मुख्तियाज खान यांच्यासह संगियोते गावानं काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे.
माझ्या बापाच्या नादी लागू नकोस; काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी
सैन्य दलाकडून या हल्ल्यानंतर शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. जंगलात सात दहशतवादी लपले असण्याची शक्यता असल्यानं ते दिसताच त्यांना गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला ३ ते ४ दहशतवाद्यांच्या गटानं हल्ला केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एनआयएकडून देखील या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संलग्न असलेल्या पीएएफएफनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती आहे.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, पुण्यात लागले अजित पवारांचे बॅनर, राष्ट्रवादी आणि घड्याळ गायब!
दरम्यान, राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंह, हवालदार मनदीप सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह शहीद झाले.

विधानसभेला चंद्रकांतदादांसाठी सीट सोडली, मेधा कुलकर्णी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीस उत्सुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here