मुंबई :ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी सांगितल्याप्रमाणे भारतासह जगभरात ट्विटर ब्लू टिक सेवा सुरू झाली आहे. म्हणजे आधीच महागाईने हैराण झालेल्या लोकांना आता ट्विटर ब्लू टिक मिळवण्यासाठी देखील खिसा सैल करावा लागणार आहे. ट्विटरने ब्लू व्हेरिफिकेशन टिक काढून टाकण्यात आली आहे. ट्विटर ब्लूच्या किमतींबाबत अनेक अंदाज बांधले जात होते. आता त्याच्या किंमती समोर आल्या आहेत. ट्विटरच्या वापरकर्त्यांना ब्लू टिकसाठी दरमहिना ९०० रुपये मोजावे लागणार असली तरी ही मर्यादित कालावधीसाठी ऑफर आहे. ट्विटरने गुरुवार रात्री प्रत्येक यूजरच्या प्रोफाइलवरून ब्लू टिक काढून टाकले.

ट्विटर ब्लू टिक सब्स्क्रिप्शन
जर तुम्ही Android आणि iOS वापरकर्ते असाल तर तुम्हाला ब्लू टिकसाठी दरमहा ९०० रुपये तर वेब यूजर्सना दरमहा ६५० रुपये द्यावे लागतील. तसेच जर तुम्ही ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनचा वार्षिक प्लॅन घेतला तर त्याची किंमत ६,८०० रुपये असेल. म्हणजे त्याचा एकूण मासिक खर्च सुमारे ५६६.६७ रुपये असेल, पण जर तुम्ही ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनची सेवा न घेता हे पैसे गुंतवले तर तुम्ही लखपती बनू शकता आणि तुमचा बँक बॅलेन्स भरेल.

तुम्हाला करोडपती व्हायचं आहे का?, मग ही युक्ती समजून घ्या, रोज वाचवा फक्त ५० रुपये
ट्विटर ब्लू टिकच्या पैशांनी श्रीमंत कसे व्हायचे?
जर तुम्ही दरमहिना ९०० रुपयांची बचत केली तर २ लाखांपेक्षा जास्त निधी जमा करू शकतात. यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणुकीच्या धोरणानुसार म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय असेल. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची वेळ खूप महत्त्वाची ठरेल. गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम फॉर्म्युला म्हणजे SIP किंवा पद्धतशीर गुंतवणूक योजना. या सूत्राने संपत्ती झपाट्याने वाढवता येईल. जर तुम्ही १० वर्षांसाठी दर महिन्याला ९०० रुपये गुंतवले आणि त्यावर १२% व्याजानुसार तुम्हाला २.०९ लाखांचा निधी जमा होईल.

क्या बात है! करोडपती व्हायचंय मग ‘अशी’ करा गुंतवणूक अन् करा जबरदस्त कमाई… जाणून घ्या
हुशारीने श्रीमंत बना!
कमी कालावधीत श्रीमंत बनण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही, असे तज्ञ सांगतात. कमी गुंतवणुकीतही तुम्ही मोठ्या प्रमाणात निधी सहज उभा करू शकता. यासाठी तुम्हाला गुंतवणुकीच्या योग्य पद्धतींची माहिती हवी. तुम्ही ९०० ऐवजी यापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास या हिशोबानुसार तुम्हाला दहा वर्षांत अधिक बंपर परतावा मिळेल.

लवकर निवृत्त होताय…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here