मयुरी आमले यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांनी मयुरी अभिलाष आमले यांना सरपंच म्हणून घोषित केले. निर्वाचित सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची मिरवणूक भुकूम गावठाण ते आंग्रेवाडी पर्यंत काढण्यात आली. भूकूम गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सख्खे मावस बहीण आणि भाऊ सरपंच आणि उपसरपंचपदी विराजमान झाले असल्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. उपसरपंच पदी अंकुश खाटपे यांची अगोदरच निवड झाली होती.
या अगोदरच्या सरपंच गौरी प्रसाद भरतवंश यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिकामे झाले होते. भुकूम गावच्या इतिहासात पहिल्यांदा ही निवड झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. गावचा कारभार महिलेच्या हाती आल्याने याचा गावच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
युवा सरंपच झालेल्या मयुरी आमले गावाच्या विकासासाठी मोठा बदल करणार आहेत. यामुळेच गावकऱ्यांनी विश्वासाने त्यांची बिनविरोध निवड केली आहे.यावेळी तलाठी नामदेव पासलकर ग्रामसेवक भागवत यादव,उपसरपंच अंकुश खाटपे , ग्रामपंचायत सदस्य सचिन हगवणे,सचिन आंग्रे, निलेश ननावरे, गौरी प्रसाद भरतवंश,रेखा योगेश वाघ, सुवर्णा रामदास आंग्रे, सुवर्णा सुभाष पानसरे, यावेळी पोलिस पाटील सतीश गुजर, माऊली आंग्रे, दिलीप चोरघे, योगेश वाघ, शरद पवार, पांडूरंग मराठे, नितीन कुडले, राजेंद्र आंग्रे,पोलीस कर्मचारी अनिता रवळेकर,निवास जगदाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.