नवी मुंबई :सायन पनवेल महामार्गावरील नेरुळ एलपी उड्डाणपुलावर काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू होणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून शनिवारी ड्राय रन घेण्यात आले. या मार्गावरील पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पुढील एक महिना एकच मार्गिका खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हलक्या वाहनांनी पामबीच मार्गाचा वापर करावा, असे आव्हान नवी मुंबई पोलिसांनी केले आहेभरधाव वेग आणि सर्वात व्यस्त म्हणून सायन पनवेल महामार्गाची ओळख आहे. त्यामुळे या मार्गावर रोजच लाखो वाहनांची वर्दळ असते. मुंबई, ठाण्याकडून पुणे, सातारा, कोल्हापूर, बंगळुरुला जाण्यासाठी याच मार्गाचा वापर अधिक होतो. येथील वाहतूक वर्दळ पाहता रस्त्यावर पडणारे खड्डे देखील तितकेच मोठे असतात. या खड्ड्यातून कायमची मुक्तता व्हावी यासाठी नेरूळ एलपी उड्डाणपुलावर काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

हे काम २२ एप्रिलपासून पुढील एक महिना चालणार आहे. त्यासाठी पुण्याकडे जाणाऱ्या दोन मार्गिका बंद करण्यात आल्या असून एक मार्गिका खुली ठेवण्यात आली आहे. त्यामुळे येथील वाहनांची वर्दळ पाहता वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी पामबीच मार्गाचा वापर करावा, तसेच जड वाहन चालकांनी शक्य होईल तितके या मार्गावरून जाण्याचे टाळावे असे आव्हान नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात सोमवारपासून मेघगर्जनेसह पाऊस; पुढील ५ दिवस असं असेल हवामान
एल पी ब्रिजच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई ठाणे दिशेने पुण्याकडे जाणारी वाहने शिरवणे एमआयडीसी सर्व्हिस रोडवरून खिंडीमार्गे वळवण्यात आली आहेत. शिरवने जंक्शन, एल पी जंक्शन येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून एकूण चार अधिकारी, २१ पोलीस तीन शिफ्टमध्ये तर ठेकेदाराने प्रत्येकी वीस-वीस वार्डन दोन शिफ्टमध्ये असणार आहेत.

कोलकत्ता मेट्रोने रचला इतिहास, पाण्याखालून पहिल्यांदाच धावली मॅट्रो

शनिवारी २४ तासासाठी ड्राय रन घेणार असून वाहतूक कशी सुरळीत होईल याचे नियोजन काम सुरू करण्यापूर्वी करणार आहोत, असे तुर्भे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी सांगितले.

जागा मिळेना. त्रास सरेना! लोकलमधील डब्यांच्या मर्यादित संख्येमुळे महिलांच्या अडचणी कायम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here