लखनऊ :आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंटस यांच्यात लढत सुरु आहे. गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल गेल्या अनेक सामन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताकडून खेळताना कसोटी, वनडे आणि टी-२० सामन्यांमध्ये शुभमन गिलनं चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा तो प्रमुख फलंदाज म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. मात्र, आज त्याच्या नावापुढं नकोसा विक्रम नोंदवला गेला.

शुभमन गिलनं आज लखनऊ सुपर जायंटस विरुद्धच्या सामन्यात आक्रमक सुरुवात करण्याच प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये त्याला यश आलं नाही. हार्दिक पंड्यानं टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता. सलामीवीरांकडून चांगल्या सुरुवातीची त्याला अपेक्षा होती. मात्र, ती पूर्ण होऊ शकली नाही. कृणाल पंड्यानं शुभमन गिलला पहिल्याच ओव्हरमध्ये बाद करत तंबूत परत पाठवलं.

LSG vs GT Live Score: केएल राहुलचे शानदार अर्धशतक, कृणाल पांड्याची फटकेबाजीही सुरूच धावा

आयपीएलमध्ये शुभमन गिल चौथ्यांदा शुन्यावर बाद

शुभमन गिल २०२१ पासून आतापर्यंतच्या आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारा क्रिकेटर ठरला आहे. शुभमन गिलनं गुजरात साठी ३८ वेळा डावाची सुरुवात केली आहे. यामध्ये तो चार वेळा शुन्यावर बाद झाला आहे. आरसीबीचा कप्तान फाफ डु प्लेसिस देखील चार वेळा शुन्यावर बाद झाला आहे. फाफ डु प्लेसिस आणि शुभमन गिल हे दोघेही संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर आहेत. तर, अनुज रावत, देवदत्त पडिकल, के.एल. राहुल, पृथ्वी शॉ तीन वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.

यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमन गिलनं ६ सामन्यांमध्ये २२८ धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमन गिल सर्वाधिक धावा करणाऱ्या १० जणांमध्ये आहे.

सायन-पनवेल हायवेवर दुरुस्ती, पुढील महिनाभर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन मार्गिका बंद

दरम्यान, गुजरात टायटन्सनं आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंटस पुढं १३६ धावांचं आव्हान ठेवलं. गुजरातचे फलंदाज आज चांगली खेळी करु शकले नाहीत.

के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत, भाजप-सेना आमदार संपर्कात असल्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here