रत्नागिरी/दापोली :रत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहराजवळ जालगाव बाजारपेठ येथे एका तीस वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जालगाव बाजारपेठ परिसरात राहणाऱ्या तीस वर्षीय अजिंक्य सुधीर तलाठी या युवकाने घरातील वरच्या मजल्यावर रुममध्ये फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहेअजिंक्य तलाठी याने ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याची माहिती अद्याप मिळू शकले नाही. यासंदर्भात दापोली पोलीस तपास करत आहेत.

अजिंक्य बराच वेळ खाली घरी न आल्याने घरातील कुटुंबीय वरती रूममध्ये बघण्यास गेले होते. त्यावेळी हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला. हे सगळे दृश्य म्हणून कुटुंबही हादरून गेले. या सगळ्या घटनेची खबर दापोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवला.

या धक्कादायक घटनेने परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. जालगाव येथील प्लास्टिक इंडस्ट्रीजचे मालक व श्री गोपाळकृष्ण सहकारी पतसंस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष सुधीर तलाठी यांचा तो सुपुत्र होता.

लग्नासाठी मुलगी बघायला गेला, पण आईच्या प्रेमात पडला, दोनच दिवसात दोघांनी मिळून…
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजिंक्य तलाठी याने २० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या जालगाव बाजारपेठ येथील घराच्या वरच्या बेडरूममध्ये कापडी बेडशीटच्या सहाय्याने सिलिंग फॅनला गळफास लावून घेवून आत्महत्या केली.

मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली

हा सगळा प्रकार रात्री लक्षात आला पण त्याआधी किती वेळ हा प्रकार घडला असावा याची माहिती उपलब्ध नाही. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉनस्टेबल राजेंद्र नलवडे करत आहेत.

चहा घेतला, खोलीत गेला… हळदीच्या दिवशीच डॉक्टरने स्वतःला संपवलं, लग्नघरात शोककळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here