वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर टिकटॉक आणि वीचॅट या दोन अॅपवर बंदी आणण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार आता या दोन्ही कंपन्यांना कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नाही. ट्रम्प यांनी याआधी अमेरिकन कंपनीला टिकटॉक विकावे अथवा अमेरिकेतून गाशा गुंडाळा, असा इशारा बाइटडान्स या कंपनीला दिला होता. त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्या आदेशावर ट्रम्प यांनी आता स्वाक्षरी केली आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी सायंकाळी चिनी अॅप असलेल्या टिकटॉक आणि वीचॅटवर ४५ दिवसांमध्ये बंदी आणण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्याआधी सिनेटने अमेरिकन सरकारच्या कर्मचाऱ्यांनी टिकटॉक वापरू नये, यासाठी एकमताने आदेश पारित केला. ट्रम्प यांनी आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर म्हटले की, ही बंदी आवश्यक आहे. टिकटॉकसारख्या ‘अविश्वसनीय’ अॅपने डेटा, माहिती जमा करणे हे राष्ट्रीय सुरक्षतेसाठी धोका आहे. या माहितीच्या आधारे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडे अमेरिकन नागरिकांची खासगी माहिती जात असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. चीनकडून या खासगी माहितीचा दुरुपयोग होण्याची अधिक भीती असून कॉर्पोरेट हेरगिरी होण्याचा धोका संभावत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. या आदेशानंतर आता टिकटॉक १५ सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनीला विकावे लागणार आहे.

वाचा:

वाचा:

दरम्यान, ट्रम्प यांनी बंदीच्या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर टिकटॉक, वीचॅट आणि मायक्रोसॉफ्टकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. अमेरिकन कंपन्यांसोबत सध्या चर्चा सुरू असून टिकटॉकची मुख्य कंपनी बाइट डान्स टिकटॉकमधील काही भाग विकू शकते असे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. एक महिन्यापूर्वी टिकटॉकने यामध्ये काही बदल करण्याबाबत सूतोवाच केले होते.त्यानंतर टिकटॉकचे अमेरिकेतील मोठा भाग मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार असल्याचे वृत्त होते. त्याआधी टिकटॉकचे व्यवस्थापन मागील काही दिवसांपासून चीन सरकारपासून अंतर राखून आहे. मे महिन्यातच डिझनीशी संबंधित असलेले केविन मेयर यांना आपले सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. त्याशिवाय बाइटडान्सने आपले मुख्य कार्यालय बीजिंगहून वॉशिंग्टनला हलवण्याची तयारी दर्शवली आहे.

वाचा:

अमेरिकन काँग्रेसच्या २५ सदस्यीय एका टीमने राष्ट्रपती ट्रम्प यांना अमेरिकन नागरिकांच्या डेटा सुरक्षितेबाबत पावले उचलण्याचा आग्रह केला होता. टिकटॉकच्या डेटामुळे चीनचा कम्युनिस्ट पक्ष आणि सरकार अधिक सक्षम होत असल्याचा दावा त्यांनी केला. भारताने टिकटॉकसह १०६ अॅपवर बंदी आ. यामध्ये बाइट डान्स कंपनीशी निगडीत टिकटॉक आणि हॅलो या दोन मुख्य अॅपचा समावेश होता. हे दोन्ही अॅप भारतात लोकप्रिय आहेत. भारताने बंदी घातल्यामुळे बाइट डान्सला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच इतर देशांतील बंदीपासून वाचण्यासाठी बाइट डान्सने धडपड सुरू केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here