बीड: “तू मला खूप आवडते”, असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या विधवा वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे ही पीडित महिला आपल्या घरातील बाथरुममध्ये आंघोळ करत होती. तेव्हा या महिलेचा दीर बाथरुममध्ये शिरला आणि त्याने अश्लिल चाळे करायला सुरुवात केली. ही संतापाजनक घटना बीडमधील धारुर तालुक्यात घडली आहे.

पीडित महिला ही विधवा आहे. ही एका गावातील शेतात आपल्या १४ वर्षीय मुलासोबत राहते. महिला आंघोळीला गेली असता तिचा सख्खा दीर बाथरुममध्ये घुसला आणि तिच्यासोबत जबरदस्ती अश्लिल चाळे करु लागला. “तू मला खूप आवडतेस” म्हणत त्याने वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेनं नकार देताच दिराने तिला धमकीही दिली. दिराच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पीडित महिलेनं आरडाओरड सुरु केली, यामुळे शेजारील लोक जमा झाले आणि दिराने तिथून पळ काढला.

LSG vs GT: गुजरात शेर, लखनौ ढेर; एकट्या मोहित शर्माने फिरवला सामना!
दरम्यान, पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरुन बीडच्या दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत, भाजप-सेना आमदार संपर्कात असल्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here