छत्रपती संभाजीनगर:कांचनवाडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या व्हॉट्सअप क्रमांकावर अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने या महिलेचा जिममधील फोटो तिच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवून, ‘आय वॉन्ट यू इन धीस पोजिशन, आय वील लाईक युवर बॅक’ असा अश्लील मजकूर पाठवला. ही धक्कादायक घटना १२ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचनवाडी परिसरामध्ये राहणारी एक महिला जिमला जाते. दरम्यान अज्ञात व्यक्तीने महिलेचे जिममधील फोटो कॅमेरात कैद केले. हे फोटो दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने संबंधित महिलेच्या मोबाइलवर मेसेज केला. या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, ‘बेबी आय वॉन्ट टू लाइक यू….. प्रॉमिस आय विल डू व्हॉटएव्हर यू से…’, त्यानंतर संबंधित महिलेचे जिममध्ये वर्कआउट करतानाचे फोटो तिच्या मोबाइल क्रमांकावर पाठवले.

RCB vs RR Pitch Report: आरसीबीच्या घरात होणार राजस्थानचा हल्लाबोल, जाणून घ्या कशी आहे खेळपट्टी आणि हवामान
आरोपीने पाठवलेल्या फोटोच्या खाली पुन्हा मेसेज केला. त्यामध्ये लिहिलं होतं की, ‘आय वॉन्ट यू इन धिस पोझिशन… आय विल लाईक युअर बॅक’ असा अश्लील मेसेज केला. दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित महिला प्रचंड घाबरली होती. तिने तात्काळ महिलेने सातारा पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेल्या प्रकार सांगितला.

मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, भीक मागणाऱ्या मुलीला घरी आणले, काम दिले, लग्नही लावले, पण तिने केले…
याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सातारा पोलीस करीत आहेत.

के चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष राज्यात मुसंडी मारण्याच्या तयारीत, भाजप-सेना आमदार संपर्कात असल्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here