धार:दोन वर्षांपूर्वी करोनात मृत्यू झालेली एक व्यक्ती अचानक जिवंत झाला. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील करोंद कला गावातील सर्वांनाच धक्का बसला जेव्हा त्यांना हे कळालं की ज्या व्यक्तीला ते मृत समजत होते ती जिवंत आहे. इंदूरपासून ८० किमी अंतरावर असलेल्या बदनावार तहसीलच्या करोंद कला गावातील लोकांना असं वाटत होतं की रेखाचे पती कमलेश पाटीदार यांचा गुजरातमधील वडोदरा येथे करोनाने मृत्यू झाला. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांचा करोनाने मृत्यू झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आलं होतं. इतकंच नाही तर पीपीई किटमध्ये झाकलेल्या मृतदेहावर त्यांनी अंत्यसंस्कारही केले.पती जिवंत असल्याची माहिती मिळताच दोन वर्षांपासून पतीच्या मृत्यूचा शोक करत असलेल्या रेखा पाटीदारने शनिवारी थरथरत्या बोटांनी कपाळावर कुंकू लावलं. करोंद कला गावापासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सरदारपूरजवळील बडवेली गावात शनिवारी पहाटे कमलेश पाटीदार आपल्या मामाच्या घरी पोहोचले. त्यांना बघून कोणालाच आपल्या डोळ्यांवर विश्वास होत नव्हता. कमलेशचे वडील गेंदालाल पाटीदार यांनी टाइम्सशी बोलताना सांगितले की, माझा मेहुणा रामेश्वरने मला वारंवार सांगितलं की त्याने कमलेशला पाहिलं, पण माझा विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर मी त्याला व्हिडिओ कॉल करायला सांगितलं, त्याने व्हिडिओ कॉल केला तेव्हा कमलेशला पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला, मी जोरात ओरडलो. तर, दुसरीकडे कमलेशला पाहताच त्याची पत्नी रेखा पाटीदारला धक्का बसला आणि त्यांना रडू कोसळलं. कमलेशचे वडीलही भावूक झाले.

२४ डोळे, हार्ट अटॅक आणणारं विष… एका इंचाच्या या प्राण्याने शास्त्रज्ञांची झोप उडवली…
पहाटे मामाच्या घरी पोहोचला कमलेश

शनिवारी पहाटे कमलेशला त्यांच्या मामाच्या घरी गेला. कमलेश यांना दारात पाहून मामा गेंदालाल यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना वाटलं की ते झोपेत आहे. पण, जेव्हा कमलेश त्यांच्याशी बोलला तेव्हा त्यांना खात्री पटली, असं त्यांनी टाइम्सला सांगितलं.

कमलेशची पत्नी रेखा पाटीदार यांनी टाइम्सशी बोलताना सांगितले की, मी फेब्रुवारी २०२१ पासून विधवा म्हणून जगते आहे. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर जे काही विधी केले जातात, ते सर्व आम्ही कमलेशसाठी केले. दोन वर्षांनंतरही काही नातेवाईक घरी शोक व्यक्त करण्यासाठी येत होते. कमलेश यांच्या मृत्यूच्या बातमीने माझ्या सासऱ्यांना सर्वात जास्त आघात झाला होता. आज दोन वर्षात पहिल्यांदाच मी त्यांना आनंदी पाहातेय. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत.

त्यानंतर कुटुंबीयांनी सरदार पोलीस ठाण्यात माहिती दिली. यानंतर वडोदरा येथील कानवन पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली, येथे कमलेशच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. धार एएसपी देवेंद्र पाटीदार यांनी सांगितले की, त्यांना कमलेश घरी परतल्याचं सांगण्यात आलं आहे. कमलेशचे मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी कुटुंबाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असंही ते म्हणाले.

करोना रुग्णसंख्येत भर, खबरदारी म्हणून मास्क लावण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

हा गोंधळ कसा झाला

कमलेशच्या एका नातेवाईकाने सांगितलं की, कमलेशला करोना झाला होता. तेव्हा जवळच्या कोणत्याही रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना वडोदरा येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याच्या नातेवाईकांना पीपीई किटमध्ये असलेला मृतदेह दाखवण्यात आला. त्यांना विश्वास बसला नाबी पण त्यांनी डॉक्टरांचं एकलं आणि कोव्हिड प्रोटोकॉलसह वडोदरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘तू खूप सुंदर आहेस…’, विमानात पुरुष अटेंडंटला केलं KISS, मद्यधुंद प्रवाशाचा प्रताप…
टोळीने ओलीस ठेवले होते

कमलेशने कुटुंबाला सांगितलं की त्याला एका टोळीने ओलीस ठेवल्याचे सांगितले आहे. कमलेशने सांगितलं की कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर त्याला अहमदाबादमध्ये काही लोकांनी ओलीस ठेवले होते. त्यांनी त्याला अंमली पदार्थाचे इंजेक्शन दिले आणि त्याला बेशुद्ध ठेवण्यात आले होते. शुक्रवारी कारमधून कुठेतरी नेत असताना आरोपी रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये थांबले. संधी साधताच कमलेश खाली उतरला आणि अहमदाबाद-इंदूर पॅसेंजर बसमध्ये चढला. रात्री उशिरा वड सरदारपूर गाठून काही लोकांच्या मदतीने त्याने बडवेली गाव गाठले. एएसपी म्हणाले की, एका टोळीने त्याला ओलीस ठेवल्याच्या तक्रारीची पोलीस चौकशी करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here