नागपूर :राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहण्याची गरज नाही. आताही राष्ट्रवादी मुख्यमंत्रीपदासाठी दावा करू शकते. आणि मुख्यमंत्री होण्याची शंभर टक्के इच्छा आहे, असं अजित पवार म्हणाले.अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेवरून आता अनेक राजकीय नेत्यांनी प्रतक्रिया दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी त्यांची मुलखात पाहिली नाही, मात्र मुख्यमंत्री व्हायला कोणालाही आवडू शकते’, देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘मुख्यमंत्री व्हायला अनेकांना आवडतं. पण सर्वांना ते होता येत नाही’, असं बोलत फडणवीस यांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी आताही मुख्यमंत्रीपदावर दावा करू शकते, अजित पवार यांचं मोठं वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून राज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांची जोरदार चर्चा सुरू होती. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र तरीही ही चर्चा थांबण्याचं नाव घेत नाही. महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री हे शांत होते. यावर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे सर्व भाकीत पाहून ऐकून माझं मनोरंजन होत होतं’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांची बदनामी स्वपक्षीयांकडूनच, चंद्रशेखर बावनकुळेंचा गंभीर आरोप
‘संजय राऊत यांना भांडणं लावायला कोणी लागत नाही’

संजय राऊत यांच्या आरोपालाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. संजय राऊत यांना भांडणं लावायला कोणी लागत नाही. महाविकास आघाडीच्या आतमध्ये काय चाललं आहे, हे मला माहीत नाही. पण ते वज्रमूठ, वज्रमूठ हे काही म्हणत आहे, त्या मुठीला इतक्या भेगा आहेत की ती कधी वज्रमूठ होऊ शकत नाही’, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here