नाशिक:चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारातील लासलगाव- मनमाड रस्त्यावर ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन ईद सणाच्या दिवशी मनमाड येथील कुरेशी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र समजला जाणारा रमजानचा महिनाभराचा कठीण असा उपवास केल्यानंतर काल सर्वत्र ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली. परंतु मनमाड येथील रहिवासी असलेल्या कुरेशी पिता पुत्राचा पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूरहून डोंबिवलीला येणाऱ्या खासगी बसला भीषण अपघात, ४ जण जागीच ठार, अनेक जखमी

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सलमान मुन्सी कुरेशी (वय २९) यांनी चांदवड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालक मोहम्मद जहांगीर अब्दुल गणी (रा. मुजफ्फरनगर, अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाड येथील आययूडीपी येथील रहिवाशी असलेले यासीन इस्माईल कुरेशी (वय ४७) व हुजेब यासीन कुरेशी (वय २०) हे दुचाकीने (एम. एच. ४१, बी. डी. ८८९७) लासलगाव मनमाड रस्त्याने मनमाडकडे येत होते. यावेळी तालुक्यातील शिंगवे शिवारातील खडी क्रेशर समोर पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच २८ एबी ८३९९) दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की इस्माईल आणि हुजेब दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शाळकरी मुलांच्या हाती वाहन देणं जीवावर, ट्रॅक्टर पलटून चिरडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कार्यवाही करत ट्रकचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच या घटनेचे वृत्त मृतांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. काल सर्वत्र मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईदचा सण साजरा केला. परंतु मनमाड येथील रहिवासी असलेल्या कुटुंबासोबत अघटीत घडले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान या घटनेत पिता पुत्राचा मृत्यू झाल्याने कुरेशी कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here