मुंबई :एमपीएससीची पूर्व परीक्षा येत्या रविवारी म्हणजे ३० एप्रिलला होणार आहे. पण या परीक्षेच्या तोंडावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटची लिंक टेलिग्रामवर शेअर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ उडाल आहे. एवढतं नव्हे टेलिग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसह इतर अनेक वैयक्तीक माहिती लिक केल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची एमपीएससीकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा कुठलाही वैयक्तीक डेटा लिक झालेला नाही. फक्त हॉल तिकीटची लिंक शेअर केली गेली आहे, असं एमपीएससीने म्हटलं आहे.

viral telegram post

टेलिग्रामची व्हायरल झालेली पोस्ट

टेलिग्रमावर शेअर केलेल्या लिंकमध्ये एमपीएससीची गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा देणाऱ्या ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटची लिंक शेअर केल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच एमपीएससीने विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने वितरीत केले आहेत. पण सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट एकाच लिंकवर शेअर करण्यात आल्याने आणि त्यासोबतच ऑनलाइन पोर्टल लॉगइन, फी पावती, अपलोड कागदपत्रे, आधारकार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आणि इतर माहिती उपलब्ध असल्याचा दावा टेलिग्रामवरील पोस्टवरून करण्यात आला होता. एवढचं नव्हे तर ३० तारखेला होणाऱ्या पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिकाही उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला.
टेलिग्रामवरील पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि या पोस्टमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याची दखल आयोगाने घेतली आहे. आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. एमपीएससी उमेदवारांचा वैयक्तीक डाटा उपलब्ध झाल्याचा दावा टेलिग्राम चॅनेलवरून करण्यात आला. हा दावा पूर्णपणे खोटा आहे. उमेदवारांच्या हॉल तिकीटची लिंक शेअर केली गेली आहे, असं एमपीएससीने म्हटलं आहे. एमपीएससीने या प्रकरणी ट्विट करून माहिती दिली आहे. एमपीएससीने पत्रक जारी केलं आहे.

mpsc issue letter

एमपीएससीने जारी केले प्रसिद्धी पत्रक

कुलगुरूंच्या खुर्चीत बसून रॅप साँग!, आरोपीवर कारवाई करा, अजित पवार यांची मागणी
एमपीएससीने काय म्हटलं आहे?

१. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे दिनांक २१ एप्रिल २०२३ ला आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनेलवरर प्रसिद्ध होत असल्याची बाब आज निदर्शनास आली आहे. सदर बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. सदर चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे (हॉल तिकीट) वगळता उमेदवारांचा कोणताही अन्यडेटा लिक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच सदर चॅनेलवर उमेदवारांचा वैयक्तिक डेटा आणि प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचा दावा धादांत खोटा आहे आहे. अशाप्रकारे कोणताही डेटा अथवा प्रश्नपत्रिका लिक झालेली नाही.
२. आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे डाउनलोड करून घेतलेल्या प्रवेशप्रमाणपत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

३. प्रवेशप्रमाणपत्र लिक करणाऱ्या चॅनेलच्या अॅडमिनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. प्रस्तुत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

४. तसेच पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार विषयांकित परीक्षेचे आयोजन करण्यात येईल.

विद्यार्थ्यांना डेटा लिकचा संशय

एमपीएससीने फक्त काही वेळातच माहिती दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी. हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लिक झाले आहे. मग डेटा लिक झाला नसेल हे कशावरून? असा प्रश्न विचारत शंका उपस्थित केली आहे. तसंच प्रश्नपत्रिकाही लिक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरण एमपीएससीने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here