गंगटोक:सिक्किमची राजधानी गंगटोकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. ११ वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर सिक्किम राज्यात दहशतीचं वातावरण आहे. पोलिसांनी आरोपी प्रीतम शर्मा (२९) याला अटक केली आहे. आरोपी मूळचा बिहार राज्यातील असल्याची माहिती आहे. तो गेल्या १० वर्षांपासून गंगटोकमध्ये टॅक्सी चालवत असल्याची माहिती आहे. गंगटोकमध्ये पोलिसांच्या विशेष पथकाकडून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर आयपीसीच्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला १ मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार पीडित मुलीचा मृतदेह १४ एप्रिलला गंगटोकच्या पथांग येथे जंगलात आढळला होता. पीडित मुलीच्या आईनं १० एप्रिल रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला होता. पोलिसांनी तपासानंतर गंकटोकमध्ये टॅक्सी चालवणाऱ्या प्रीतम याला अटक केली आहे.

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप, नातेवाईकांची रुग्णालयावर दगडफेक

आरोपीनं दिली गुन्ह्याची कबुली

आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. चौकशी दरम्यान आरोपीनं मुलीवर अत्याचार करुन हत्या केल्याचं कबूल केलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

टेलिग्राम पोस्टमुळे MPSCचे विद्यार्थी गोंधळले, घाबरू नका डेटा लिक झालेला नाही, आयोगाचे ट्विट

आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं शाळेच्या गणवेशात असलेल्या विद्यार्थिनीला लिफ्ट दिली होती. पाऊस असल्यानं त्यानं तिला लिफ्ट दिली होती. त्यानंतर आरोपीनं तिला निर्जन स्थळी जंगलात नेण्यात आलं होतं. आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी पीडित मुलीच्या आईनं आणि कुटुंबीयांनी मागणी केली आहे.

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here