नवी दिल्ली: हिने या डिस्पेशनने त्रस्त होता अशी बनावट आणि चुकीची माहिती पसरवल्याची माहिती बिहार सरकारने सुप्रीम कोर्टाला सादर केली आहे. इतकेच नाही, तर रिया आणि तिच्या निकटवर्तीयांचा उद्देश सुशांतसिंह राजपूतचा पैसा हडप करणे हा होता असेही बिहार पोलिसांचे म्हणणे आहे. सुशांतसिंह याच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पाटणा येथील एका पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.

‘सुशांतसिंहला चित्रपटसृष्टीच सोडायची होती’

बिहार सरकारने आज सुप्रीम कोर्टात सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात अभिनेता सुशांतसिंह राजपूतला चित्रपटसृष्टीच सोडायची होती, असे नमूद करण्यात आले आहे. आपण जैविक शेती करावी असे त्याला वाटत होते. याच कारणामुळे रिया चक्रवर्तीने सुशांतसिंहला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर धमकी देखील दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आपण सुशांतसिंहचे मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करू अशी धमकी ती त्याला देत असे. या द्वारे आपण सुशांतला मनोरुग्ण असल्याचे सिद्ध करू आणि त्यानंतर त्याला चित्रपटांमध्ये कामच मिळणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या रिया सुशांतसिंहला देत असल्याचे बिहार सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

वाचा-

‘८ जूनला रिया सामान घेऊन आली’
८ जून रोजी रिया आपल्या सोबत पैसे, लॅपटॉप क्रेडीट कार्ड आणि दागिने घेऊन गेली असे बिहार सरकारने सुप्रीम कोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ती आपल्याबरोबर महत्त्वाची कागदपत्रेही नेले असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. रियाने आपल्याला अडकवण्याची धमकी दिल्याची माहिती सुशांतसिंहने आपल्या बहिणीला दिली होती.

इतकेच नाही तर सुशांतसिंहच्या बँक खात्यात १७ कोटी रुपये होते असे पोलिसांना तपासात आढळल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. जी व्यक्ती सुशांतशी संबंधित नव्हती अशा व्यक्तीच्या बँक खात्यात सुशांतसिंहचे १५ कोटी रुपये वळते केल्याचेही पोलिसांना आढळले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here