पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तीन चार वर्षांच्या व्यापक विचारमंथनानंतर हे शिक्षण धोरण स्वीकारण्यात आले आहे. आज देशभरात या धोरणावर चर्चा होत आहे. लोक आपापली मते मांडत आहेत. हा संवाद सकारात्मक आहे, तो जितका चांगला होईल, तितका तो शिक्षण क्षेत्राला फायदेशीर आहे.’
‘हे धोरण एकांगी आहे, असा आरोप कोणीही केलेला नाही. गेल्या कित्येक वर्षात शिक्षण क्षेत्राच्या धोरणात बदल झाला नव्हता. अर्थात याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न उपस्थित होणार, पण आपल्या सर्वांना याच्या योग्य अंमलबजावणीसाठी काम करायचे आहे. जोपर्यंत राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे, मी पूर्णपणे कटिबद्ध आहे’ अशी ग्वाही मोदी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण ऐका –
‘प्रत्येक देश आपल्या शिक्षण व्यवस्थेची आपल्या राष्ट्रीय मूल्यांशी सांगड घालत आपल्या राष्ट्रीय उद्द्ीष्टांच्या पूर्ततेसाठी काम करत पुढे जातो. याचं उद्दिष्ट हेच असते की देशाची शिक्षण व्यवस्था आपल्या वर्तमान आणि येणाऱ्या पिढ्यांना भविष्यासाठी तयार करेल. भारताच्या नव्या शिक्षण धोरणाचा आधारदेखील हाच विचार आहे. एकविसाव्या शतकातील नव्या भारताचा पाया रचण्याचं काम हे शिक्षण धोरण करणार आहे,’ असंही पंतप्रधान म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times